मेष सध्या मानसन्मानात वाढ ,आर्थिक लाभ कार्यक्षेत्रात संधी असा काळ आहे.आज भाग्य तुमच्या सोबत राहणार आहे. दगदग होईल. प्रकृती जपा. मात्र अद्भुत ऊर्जावान दिवस .प्रवास संभवतात.
वृषभ आज धन स्थानात चंद्र भ्रमण आहे , तुम्हाला घरगुती जीवनात अनेक नवीन प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात लाभ होईल. , नातेवाईक भेट असा हा दिवस आहे. प्रकृती आणि मनस्वास्थ्य सांभाळा.
मिथुन आज व्यवसाय आणि कुटुंबीय ही तुमची प्राथमिकता असेल.कार्यालयीन कामकाज वाढेल. काही घरासाठी विशेष वस्तू तुम्ही खरेदी कराल. प्रकृती जपा. दिवस शुभ.
कर्क दिवस काही महत्वाचे व्यवहार घडवून आणेल . घरात काम निघेल. मात्र त्यात अडचणी येतील. खर्च झाला तरी प्राप्ती होईल.महत्वाचे संपर्क होतील. संततीला जपा. साधारण दिवस आहे.
सिंह आज कुठूनतरी सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्याचे योग येतील.संततीचे सुख चांगले असून शेजाऱ्यांशी सांभाळून वागा. घरात ,कामात वाढ होईल.आर्थिक गणित जुळून येतील. दिवस उत्तम आहे.
कन्या घरामध्ये किंवा सामाजिक जीवनात यश मिळेल.शांत रहा. तुमचा हेवा वाटणारे लोक फायदा घेतील. प्रवास आणि व्यवसायात लाभ संभवतात. वैवाहिक सुख मिळेल.दिवस उत्तम.
तुला चंद्राचे भाग्य स्थानातून भ्रमण आणि तृतीय शुक्र आज आनंदात राहण्याचे संकेत देत आहे.आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला असेल. काही अचानक खर्च होईल. प्रकृती चांगली राहील.दिवस शुभ.
वृश्चिक सप्तम मंगळ वैवाहिक जीवनात काही तरी ताण निर्माण करेल. सूर्य धन स्थानात असून आर्थिक व्यय होतील. अष्टम चंद्र काहीसा तणाव निर्माण करेल.मात्र राशीतील शुक्र उत्तम फळ देईल .दिवस शुभ.दिवस मध्यम.
धनु आज घरातील महत्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. वैवाहिक जीवनात कलह टाळा .खर्च होतील .
मकर आज दिवस शुभ असून भाग्य जोरात आहे. राहू आरोग्य समस्या निर्माण करील. घरामध्ये अधिकार गाजवाल.बंधू भेटीचा लाभ होईल. प्रवास योग येतील. दिवस शुभ .
कुंभ दिवस आनंद दायक आहे.शांत रहा. आर्थिक उलाढाली होतील. होणाऱ्या खर्चाला आवर घाला. घराकडे लक्ष द्यावे लागेल.संतती सुख मिळेल कुटुंब सुख लाभेल. दिवस मध्यम.
मीन व्यवसाय,आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना शुभ लाभ मिळतील. वैवाहिक सुख मिळेल. सध्या गुरू शुभ असल्याने काही तरी धार्मिक कार्यक्रम कराल. दिवस चांगला. शुभम भवतू!!