December 10, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष सध्या मानसन्मानात वाढ, आर्थिक लाभ कार्यक्षेत्रात संधी असा काळ आहे. मात्र आज भाग्य तुमच्या सोबत राहणार नाही. खर्च होईल. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल.मध्यम दिवस .

वृषभ आज लाभ स्थानात चंद्र भ्रमण आहे. तुम्हाला घरगुती जीवनात अनेक नवीन प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात लाभ होईल.नातेवाईक भेट असा हा दिवस आहे. प्रकृती आणि मन स्वास्थ्य सांभाळा.

मिथुन आज व्यवसाय आणि कुटुंबीय ही तुमची प्राथमिकता असेल. कार्यालयीन कामकाज, प्रवास काही घरासाठी विशेष वस्तू तुम्ही खरेदी कराल.प्रकृती जपा. दिवस शुभ.

कर्क दिवस काही महत्त्वाचे व्यवहार घडवून आणेल. घरात काम निघेल.मात्र त्यात अडचणी येतील. खर्च झाला तरी प्राप्ती होईल. महत्त्वाचे संपर्क होतील. भाग्यकारक दिवस आहे.

सिंह आज कुठूनतरी सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्याचे योग येतील. संततीचं सुख चांगले असून शेजाऱ्यांशी सांभाळून वागा. कामात वाढ होईल. आर्थिक गणितं जुळून येतील.दिवस मध्यम आहे.

कन्या घरामध्ये किंवा सामाजिक जीवनात यश मिळेल. शांत रहा. तुमचा हेवा वाटणारे लोक फायदा घेतील.व्यवसायात लाभ संभवतात. वैवाहिक सुख मिळेल. दिवस उत्तम.

तूळ चंद्राचे षष्ठ स्थानातून भ्रमण आणि सप्तम राहू आज जपून राहण्याचे संकेत देत आहे.आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असेल.काही अचानक खर्च होईल. प्रकृती सांभाळा. दिवस मध्यम.

वृश्चिक मंगळ घरामध्ये काही तरी ताण निर्माण करेल.सूर्य व्यय स्थानात असून कायद्याचे भय बाळगा. आर्थिक व्यय होतील. पंचमातील गुरू चंद्र मनःशांती देईल. दिवस शुभ.

धनु आज घरातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. वैवाहिक जीवनात कलह टाळा. मात्र नवीन संधी मिळेल.दिवस शुभ.

मकर आज दिवस शुभ असून भाग्य जोरात आहे. राहू आरोग्य समस्या निर्माण करील. घरामध्ये अधिकार गाजवाल.बंधू भेटीचा लाभ होईल. प्रवास योग येतील. दिवस शुभ .

कुंभ दिवस आनंददायक आहे.शांत रहा. आर्थिक उलाढाली होतील. होणाऱ्या खर्चाला आवर घाला. घराकडे लक्ष द्यावं लागेल.संतती सुख मिळेल कुटुंब सुख लाभेल. दिवस मध्यम.

मीन व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना शुभ लाभ मिळतील. वैवाहिक सुख मिळेल. सध्या गुरू शुभ असल्याने काही तरी धार्मिक कार्यक्रम कराल. दिवस चांगला. शुभम भवतू!!

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click