December 10, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष चंद्र कार्यक्षेत्र आणि घरा बाबतीत आज विशेष फळ देईल . राशीतील राहू मानसिक क्लेश देईल . त्यादृष्टीने सावध असावे.तृतीय मंगळ सर्व दृष्ट्या जपून रहा असे संकेत देत आहे. कुटुंबा सोबत आनंदात दिवस घालवा. दिवस चांगला आहे.

वृषभ आज राशीच्या भाग्य स्थानातील चंद्र कार्यक्षेत्रात काही विशेष लाभ मिळवुन देईल.आनंद मिळेल.वैवाहिक जीवन सुखद राहील. शुक्र घरात उत्तम खरेदीचे योग आणेल. उत्तम दिवस.

मिथुन चंद्र भ्रमण विष योग करीत आहे.अष्टम स्थानातून विचित्र अनुभव येतील. एक प्रकारे नैराश्य वाटेल. आर्थिक बाजू बरी राहिल. वक्री मंगळ खर्च वाढवेल.दिवस मध्यम जाईल.

कर्क सप्तम स्थानातील चंद्र आणि चतुर्थ शुक्र जीवनात विशेष अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहिल. मन आनंदी होईल.मित्र मंडळ भेटेल. लाभाचे योग येतील. मात्र खर्च ही होईल. दिवस शुभ.

सिंह आज षष्ठात चंद्रशनी गृह सुख, प्रकृतीबाबत कष्ट देईल. मन अस्थिर राहिल. आर्थिक दृष्ट्या घडामोडी होतील. वाचन लेखन यात वेळ घालवा.संतती आनंदी राहिल. दिवस मध्यम.

कन्या आज चंद्र पंचम स्थानात आहे. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे तुम्ही व्यग्र राहाल.आदर आणि सन्मान वाढेल. गुरू विवाह जमण्याकरता मदत करेल. दिवस मध्यम.

तूळ आज चंद्र शनी घरामध्ये मध्यम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे.कार्यक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आर्थिक भरभराट होईल. संततीचे मन सांभाळा. प्रकृती जपा.दिवस शुभ.

वृश्चिक आज मानसिक ताणात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृतीसंबंधी मध्यम फळ देईल. निरुत्साह वाटेल.घरामध्ये काही विशेष घटना घडतील. जोडीदार मदत करेल. प्रवास योग येतील. दिवस मध्यम.

धनु आज जीवनातील एक चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. आर्थिक बाबी जपा. चंद्र शुभ फळ देईल.जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.

मकर शनी मकर राशीमध्ये मार्गी असून मंगळ षडाष्टक, ताणतणाव निर्माण करेल. प्रकृतीकडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते.आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग येतील. उत्तम दिवस.

कुंभ व्यय चंद्र शनी योग आज दिवस आनंदात घालवा असं सुचवत आहे.कार्यक्षेत्राकडे लक्ष द्या. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. सामाजिक प्रतिष्ठा. आर्थिक लाभ.दिवस शुभ.

मीन आज चंद्र मानसिक स्थैर्य देईल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील . धार्मिक स्थानाचा प्रवास होईल.खर्च संभवतात. भावंडाना त्रास. दिवस मध्यम. शुभम भवतू!!

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click