December 10, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष : आपणाला आज उत्तम संकल्पना सुचतील. त्यातून अनेक उत्तम लोकांचा सहयोग लाभेल. किमती वस्तूची खरेदी करण्याचे योग संभवतात. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

वृषभ: परिवारासोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. सहलीच्या आयोजनात सहभागी व्हाल. घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च कराल. आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. काही प्रमाणात विचलितता जाणवेल.

मिथुन : आपली कार्यपद्धती सामाजिक परिवर्तन करणारी असेल. मौल्यवान वस्तू अथवा दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायद्याची राहील. अनुरुपांसाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. मित्र परिवाराचा सहवास लाभेल .

कर्क : प्रवास लांबणीवर टाकणे हिताचे राहील . जरी कामाची ओढ समजून प्रवास केलाच तरी तो तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. कौटुंबिक स्नेह वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका बजवावी लागेल. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील.

सिंह : वैद्यकीय उपचाराने प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून येईल. लॉटरी सारख्या विषयात केलेली गुंतवणूक नुकसानीचा सौदा ठरू शकेल. आज तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करा. व्यापारी वर्गाला अपेक्षित फायदा मिळवून देणारा आजचा दिवस आहे.

कन्या : व्यावहारिक जबाबदाऱ्या वाढतील. पूर्व नियोजनापेक्षा अधिक रक्कम खर्च होण्याची शकयता आहे. तुम्ही आज धनाची बचत केली पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडले जातील. नोकरदारांना दगदग वाढवणारा दिवस आहे.

तुला : आज कोणाशीही स्पर्धा करू नका. आपल्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवूनच कोणतेही पाऊल उचला. दोलायमान स्थितीमुळे लक्ष विचलित होईल. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडण तंट्याची आजच सोडवणूक करण्याची मानसिकता ठेवा.

वृश्चिक : आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जावर्धक आहे. शारीरिक व्यायाम तसेच क्रीडा क्षेत्राविषयीची रुची वाढेल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी तात्पुरत्या स्वरूपाचा फायदा विचारात घेऊन निर्णय करू नका. नियोजित कामे ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकताल.

धनु : तुम्हाला मार्गदर्शन करणारी मंडळी किती विश्वासाची आहेत त्याबाबत विचार करूनच त्यांच्या सल्ल्याचा विचार करा. जवळच्या मित्रांचे आणि जोडीदारांचे आक्षेपार्ह कृत्य तुमचे आयुष्य खडतर करु शकते. जमिनीचे व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पासंबंधित लोकांशी समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे.

मकर: घरात पाहून येण्याची चाहूल लागेल. वयाने किंवा मानाने मोठ्या लोकांशी केलेला विचारविमर्ष फायदेमंद ठरेल. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. भागीदारीतील प्रलंबित कामे पूर्णत्वास नेण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा.

कुंभ : साहसी खेळामध्ये सहभागी होऊ शकाल. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता शिस्तबद्ध पद्धतीने वापरली तरच फायदेशीर ठरेल. नवीन नटे संबंध जोडले जातील. तुम्ही तुमचे ज्ञान व अनुभव इतरांना सांगितल्याने तुमच्यावरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदतगार ठरेल.

मीन : शेतकरी राजाला आजचा दिवस समाधानकारक राहील. शासकीय योजनांचा लाभ मिळू शकेल. सरकार दरबारी तुमच्या नावाचा दबदबा वाढेल. तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. अति विश्वास घातक ठरू शकेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click