December 10, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. प्रलंबित प्रकरणांकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल आणि कोणत्याही कायदेशीर प्रकरणात नियमांचे पूर्णपणे पालन करावे लागेल, अन्यथा तुम्हाला त्यासाठी दंड होऊ शकतो. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल.

वृषभ : वृषभ राशीचे लोक कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करतील. मनाला शांती लाभेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक समस्या दूर होईल. सर्जनशील कार्य करण्याची संधी मिळेल. दिवाळीनिमित्त घरात स्वच्छतेवर भर दिला जाणार असून, सणानिमित्त जवळच्या व्यक्तीचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या सल्ल्याचे पालन करणारी व्यक्ती कार्यक्षेत्रात चांगले परिणाम देईल.

मिथुन : आज दिवसभर शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि राग टाळा. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. कामाच्या ठिकाणी कष्टाचे होऊ शकते. कुटुंबात मान-सन्मान मिळेल. आत्मविश्वास भरपूर असेल. वाचनाची आवड निर्माण होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. वाणीच्या प्रभावामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. मन चंचल राहील. धार्मिक कार्यावर खर्च वाढू शकतो. मित्रांच्या मदतीने व्यवसाय वाढू शकेल.

कर्क : कुटुंबातील एखाद्या सदस्याला नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. जोडीदारासोबत प्रवासाची योजना आखू शकता. भौतिक वस्तूंमध्ये रुची वाढेल. भेटवस्तू मिळतील आणि सन्मान वाढेल. सर्जनशील प्रयत्नांना फळ मिळेल. सामाजिक कार्यात रस घ्याल.

सिंह : सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस परस्पर बंधुभावाचा राहील आणि नवीन अनुभव मिळतील. हे नवीन अनुभव भविष्यात खूप फायदेशीर ठरतील. प्रयत्नांना यश मिळेल. एखादी चांगली योजना तयार केली जाईल. अपेक्षेप्रमाणे आर्थिक परिस्थिती चांगली राहील. एखाद्याच्या गोपनीयतेचा भंग करू नका. प्रतिस्पर्ध्याचा पराभव होईल. कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका. आर्थिक बाबतीत प्रगती होईल.

कन्या : आज एखादे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत असाल. वेळ खूप महत्वाचा आहे, कृपया तो सत्कारणी लावा. जर, तुम्ही नवीन घर किंवा मालमत्ता घेण्याचा विचार करत असाल, तर तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे. कामाचा व्याप वाढणार आहे. परिश्रमापेक्षा परिणाम कमी असेल. विद्यार्थ्यांनी विचार आणि समजून घेण्यात जास्त वेळ दिल्यास कोणतीही संधी वाया जाऊ शकते.

तूळ : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. जर, तुम्ही मुलांच्या करिअरची काळजी करत असाल तर, चिंता करण्याची गरज नाही. उत्पन्नाचे विविध स्त्रोत देखील उपलब्ध होतील. परंतु, खर्चात देखील वाद होईल. आपल्याला आर्थिक समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छितात, त्यांची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक : वृश्चिक राशीचे लोक त्यांना हवे ते काम करण्यात उत्सुक असतील. हा काळ तुमच्यासाठी प्रभावी ठरेल. ऑफिसच्या कामावर तुमची पकड कायम ठेवावी लागेल. तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ किंवा बक्षीस मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि दिवाळीची तयारी केली जाईल.

धनु : राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळा. नोकरीत अधिकाऱ्यांशी सामंजस्य ठेवा. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. मेहनतही जास्त होईल. स्वावलंबी व्हा. कुटुंब तुमच्यासोबत असेल. व्यवसायात वाढ होईल. मन चंचल राहील. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. खर्च जास्त होईल. आरोग्याबाबत जागरुक राहा. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल.

मकर : आज विचारपूर्वक पुढचे पाऊल टाकावे लागेल. आरोग्याबाबत काळजी घ्या. काही शारीरिक वेदना होत असतील, तर त्यात निष्काळजीपणा टाळा. तुम्हाला काही निर्णय अतिशय हुशारीने घ्यावे लागतील. जबाबदारीचे पालन करण्यापासून मागे हटू नका. नोकरी करणाऱ्या लोकांना मनाप्रमाणे काम मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावर उरणार नाही. तुमची साधी विचारसरणी लोकांना आवडेल.

कुंभ : आत्मविश्वास कमी होऊ शकतो. शांत व्हा, राग टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. खर्च जास्त होईल. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. भावनांवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. शैक्षणिक कार्यात अपेक्षित यश मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मालमत्तेत गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

मीन : आज मीन राशीच्या लोकांना आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवावे लागेल. काही लोक कुटुंबात आपले म्हणणे सिद्ध करण्यास उत्सुक असतील. सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊ शकता. दिवाळीच्या निमित्ताने घरात उत्साहाचे वातावरण असेल आणि काही खास पदार्थही बनवता येतील. कामाशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना तुमच्या मनात येतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click