December 10, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – शुभ रंग- मोरपंखी

क्षुल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी येऊ शकतात. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. महत्त्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या.

वृषभ- शुभ रंग- पिस्ता

कला क्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दात देतील. उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

मिथुन- शुभ रंग- डाळिंबी

आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे वाटेल. आज वास्तू वाहन खरेदीच्या वर्गातील अडचणी दूर होणार आहेत आशादायी दिवस. मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल.

कर्क – आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबियांशी मतभेद व गैरसमज होतील. अहंपणा मुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही. धनखर्च वाढेल.

सिंह – आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान – प्रतिष्ठा वाढेल. उक्ती व कृतीतील उग्रपणा व अहंपणा ह्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. प्रकृतीची थोडी कुरकुर राहील.

कन्या – आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक चिंता बेचैन करतील. एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल. दांपत्य जीवनात कटुता निर्माण होईल. मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य राहील.

तूळ- शुभरंग- चंदेरी

कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल. पण तुम्ही निभावून न्याल. काही जणांना अनपेक्षित पणे दुरच्या प्रवासास निघावे लागेल. रात्रीच्या प्रवासात जागेच रहा.

वृश्चिक- शुभ रंग- मोरपंखी

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल.

धनु- शुभ रंग- निळा

उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येईल. नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज कर्तव्यासच प्राधान्य देणे आवश्यक आहे. अत्यंत व्यस्त दिवस.

मकर – आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नकारात्मक विचारां पासून दूर राहा व खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या. अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. व्यापारात भागीदारांशी मतभेद वाढतील. क्रोध व आवेशावर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक कामा निमित्त प्रवास करावा लागेल.

कुंभ – आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची व नवीन वस्त्रपरिधान करण्याची संधी लाभेल.

मीन – आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास दृढ असेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणा संयमित ठेवावा लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click