December 10, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !
 1. मेष- एखादया सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. कामातला हलगर्जीपणा भविष्यात त्रासदायक ठरेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडल्यास तुमच्या अनेक समस्या दूर होतील. भावंडांसोबत सुरू असलेला संघर्ष तुम्हाला संपवावा लागेल, अन्यथा परस्पर संबंधात तेढ निर्माण होऊ शकतो
 2. .वृषभ- आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. तुमच्या मनात चांगले विचार येतील, ज्यामुळे तुम्ही तुमचा अधिकाधिक वेळ इतरांची सेवा करण्यात घालवाल. प्रेम प्रकरणातील लोकांना यश मिळेल. तुमचे काही हितशत्रू तुमचा हेवा करतील.
 3. मिथुन- व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आज दिवसाची सुरुवात चांगली होईल, पण दुपारनंतर फारसा फायदा होणार नाही. व्यसनांना आवार घालण्याची गरज आहे. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. नातेवाईकांसोबत मतभेत होण्याची शक्यता आहे.
 4. कर्क- आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. राजकारणात काम करणाऱ्या लोकांना एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जायचे असेल, तर त्यांना काही काळ वाट पाहावी लागेल. तुमची जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते, त्यानंतर तुम्ही धार्मिक स्थळाच्या यात्रेला जाऊ शकता.
 5. सिंह- आज तुमच्यामध्ये बोलण्याची जी कला आहे, त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी मिळू शकतात. नशिबाच्या मदतीने तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्या मनात काही नवीन कल्पना येतील, ज्याचा व्यवसाय करून तुम्ही नफा कमवू शकाल. तुमच्या नातेवाईकांच्या घरी मेजवानीसाठी जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी ऐकायला मिळेल. जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित सहलीला गेलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
 6. कन्या- लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आजचा दिवस चढ उतार आणेल. तुमची समजूतदारपणा दाखवून तुम्ही या परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकाल. तुम्ही नोकरी क्षेत्रात काही बदल करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते, त्यामुळे त्यांना घरापासून दूर जावे लागेल.
 7. तूळ- आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चाने भरलेला असेल. तुम्ही तुमच्या खर्चाबाबत चिंतेत राहाल. व्यवसायात अपेक्षित लाभ न मिळाल्याने काळजी असेल. कौटुंबिक वाद आज संपुष्टात येतील. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ एकांतात घालवाल. हितशत्रू नोकरीत असलेल्या लोकांवर वर्चस्व गाजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील, त्यांना अटकाव करावा लागेल.
 8. वृश्चिक- कुटुंबात मंगल कार्यक्रमाचे आयोजन करता येईल. धनसंचय करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. गोड बोलून तुम्ही लोकांची मने जिंकू शकाल. अधिकारीही कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा करताना दिसतील. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही मुलाच्या भविष्याशी संबंधित काही योजनांवर चर्चा करू शकता. तुम्हाला काही गुप्त पैसे मिळू शकतात. वडिलांशी तुमचा काही वाद असेल तर त्यामध्ये गप्प राहणेच योग्य.
 9. धनु- व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कठीण जाईल, परंतु भावांच्या मदतीने तुम्ही अडचणीतून मुक्त होऊ शकता. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला नाही, त्यामुळे निर्णय समोर ढकला. तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील, परंतु तुमच्या काही कटू बोलण्यामुळे तुमच्या मित्रांसोबत मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगावी. इतरांना सल्ले देण्यापासून दूर राहावे लागेल. आईला अचानक काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
 10. मकर- आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असणार आहे. काही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल. मोठी गुंतवणूक करणे टाळावे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कमकुवत विषयांवर मेहनत करूनच यश मिळेल. आज तुम्हाला काही जुन्या जबाबदाऱ्यांबद्दल काळजी वाटेल.
 11. कुंभ- आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असू शकतो. तुम्हाला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, तर त्यातही संयम बाळगणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही कठीण कामही पूर्ण मेहनतीने कराल. व्यवसाय करणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला धार्मिक प्रवासाला जावे लागेल. तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने आनंदी व्हाल.

मीन- नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. त्यांच्या मनाप्रमाणे काम मिळाल्याने ते अधिक आनंदी होतील. तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून गोड बोलून तुमचे काम सहज करून घेऊ शकाल, ज्यांना नोकरीसोबतच कोणतेही ऑनलाइन काम करायचे आहे, ते त्यात यशस्वीही होतील. घरातील सदस्यांमध्ये वादविवाद झाला तर दोन्ही बाजू ऐकून घेऊनच निर्णय घ्या.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click