October 5, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – (शुभ रंग – राखाडी)

आज अत्यंत सकारात्मकतेने घराबाहेर पडाल.कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल.वाणीत गोडवा ठेवून अनेक किचकट प्रश्न आज मार्गी लावता येतील.

वृषभ – (शुभ रंग – पिस्ता)

महत्त्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर ठाम रहाल.अति आत्मविश्वास आज नुकसानास कारणीभूत ठरू शकेल.आपलेच खरे न करता इतरांचेही थोडे ऐकून घेण्याची तयारी ठेवा.सुसंवाद हिताचा राहील.

मिथुन – (शुभ रंग – मोरपंखी)

नवीन व्यावसायिकांनी आपली कोत ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात.ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी.सत्संगातूनच मनास शांती मिळणार आहे.

कर्क – (शुभ रंग – हिरवा)

कार्यक्षेत्रात आज तुमचे महत्त्व वाढेल.इतरांस न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल.व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील.आज तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होईल.

सिंह – (शुभ रंग – गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी काही मनासारख्या घटना घडल्याने तुमचा उत्साह वाढेल.सहकारी तुमच्या मताचा आदर करतील.अधिकाराचा गैरवापर मात्र टाळा.कायद्याच्या चौकटीत रहा.

कन्या – (शुभ रंग – सोनेरी)

आज नोकरी धंद्यात काही विरोधी घटना घडल्याने नैराश्य येईल.विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे कामातील कोणतीही चूक महागात पडेल.अधिकाराचा वापर जपून करा.उपासनेत खंड अजिबात नको.

तूळ – (शुभ रंग – आकाशी)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही.तब्येतही आज थोडी नरमच राहणार आहे.पती-पत्नीमधील वादावर मौन हा रामबाण उपाय राहील.

वृश्चिक – (शुभ रंग – पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा पत्नीचे सल्ले आज योग्यच असतील.

धनु – (शुभ रंग – जांभळा)

ध्येय प्राप्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागतील. जुनी दुखणे अंगावर काढू नका. काही येणे असतील तर मागायला लाजू नका.आज गृहिणीसाठी अतिव्यस्त दिवस.

मकर – (शुभ रंग – मरून)

नोकरदार मंडळींना वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागेल.कलाकारांच्या उमेदवारीस यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील.रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल.

कुंभ – (शुभ रंग – केशरी)

अत्यंत आनंदी व उत्साही दिवस असून सगळी कामे सुरळीत पार पडतील.घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल.कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळींना स्ट्रगल वाढवावी लागणार आहे.

मीन – (शुभ रंग – चंदेरी)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या.संध्याकाळी मात्र आर्थिक व्यवहार जपूनच करा.विद्यार्थ्यांना आज अभ्यास बोअर करेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click