September 30, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष (Aries): प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. नियमांना सोडून वागू नका. फसव्या मित्रांपासून सावध राहावे. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. वडिलोपार्जित कामातून धनप्राप्ती होईल. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या.घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. कायदा-नियम पाळा. वाद टाळा. तब्येत जपा. हुशारीने कामं करण्यावर भर द्या.

वृषभ (Taurus): थोडी आक्रमक भूमिका घ्याल. स्त्री वर्गावरून वादाचा प्रसंग येऊ शकतो. कामात भावंडांची सहकार्य घेता येईल. तांत्रिक बाबींमध्ये बारीक लक्ष घालावे. हातातील कामे सुरळीत पार पडतील. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्र-परिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल. खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित ठेवा. तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे हिताचे.

मिथुन (Gemini) : दिवस समाधानात जाईल. होकारात होकार मिसळावा लागेल. प्रसंगातील अनुकूलता लक्षात घ्यावी. अचानक समोर आलेल्या कामातून लाभ संभवतो. कामातील दिरंगाई टाळावी. प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. खर्च जपून करा. समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकून घ्या आणि समजून घ्या नंतर बोला.

कर्क (Cancer) : शक्यतो अकारण होणारे गैरसमज टाळावे लागतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. कोणत्याही गोष्टीची जास्त चिकित्सा करत बसू नका. प्रयत्नात कसूर करू नका. तुमच्या तिजोरीत भर पडेल. आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. संयम आणि जिद्द महत्त्वाची. नियोजन करुन कामं करा. आर्थिक नियोजन करा.

सिंह (Leo) : दिवसभर कार्यरत राहावे लागेल. भाऊबंदकीत वाद संभवतात. वाहन चालवताना सतर्क रहा. जोडीदाराचा शब्द प्रमाण मानावा लागेल. घरगुती कामात व्यस्त राहाल. आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अशक्तपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल. दरारा वाढेल. प्रभाव वाढेल.

कन्या (Virgo) : आत्मसंयमन करावे लागेल. अतिधाडस करायला जाऊ नये. स्वयं शिस्त पाळणे आवश्यक आहे. नियोजनबद्ध कामात सफल व्हाल. व्यावसायिक प्रवास सावधानतेने करावेत. उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल. घरातील मंडळींशी आदराने वागा. वाद टाळा. माणसं जोडणे हिताचे. तब्येत जपा. कायदा-नियम पाळा. नेतृत्वाची संधी मिळेल. प्रगती होईल.

तुळ (Libra) : जोडीदाराला अचानक लाभ होईल. जवळच्या लोकांना दुर्लक्षित करू नका. बेफिकिरीने वागून चालणार नाही. कठोर परिश्रमास पर्याय नाही. जवळचा प्रवास घडेल. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. तब्येत जपा आणि बाहेरचे खाणे टाळा. ताजे सकस अन्न खा.

वृश्‍चिक (Scorpio) : कामाच्या ठिकाणी चिडचिड वाढू शकते. एकमेकांच्या सहकार्याने कामे करावीत. परदेशी कामातून लाभ संभवतो. मोहाला बळी पडू नका. खिशाला कात्री लागणार नाही याची काळजी घ्यावी. आज या राशीतील व्यक्तींनी विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा. बदल स्वीकारा. नवी कौशल्य आत्मसात करा. आत्मनिर्भर होण्यावर भर द्या.

धनु (Sagittarius) : सध्याच्या परिस्थितीत बिनधास्त वागून चालणार नाही. अध्यापक वर्गावर जबाबदारी वाढू शकते. जोडीदारासोबतचे वाद वाढू देऊ नका. वात विकार बळावू शकतात. मानसिक स्थैर्य जपावे. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नियोजन करा. आर्थिक नियोजनावर भर द्या. खर्च जपून आणि विचारपूर्वक करा.

मकर (Capricorn) : आज मनाप्रमाणे वागण्याचे ठरवाल. खेळाडूंनी कसरतीत कसूर करू नये. थोड्याशा यशाने उतू नका. सारासार विचारावर भर द्या. मधुमेहींनी खाण्याची पथ्ये पाळावीत. खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे. इतरांवर प्रभाव टाकाल.

कुंभ (Aquarious) : दूरच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. आततायीपणे वागून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींवर वाद घालू नका. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या. नवीन ओळखी वाढवाव्यात. आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल. प्रगतीची महत्त्वाची संधी मिळेल.

मीन (Pisces) : काही वेळेस तारेवरची कसरत करावी लागू शकते. हातातील चांगली संधी सोडू नका. नियोजन करून कामे करावीत. प्रवासात भरकटू नका. वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल. आर्थिक नियोजन आणि दिवसभराच्या कामाचे नियोजन करा. वेळेचे नियोजन महत्त्वाचे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click