मेष – लवकरच एखादी अशी परिस्थिती येईल जिथे खिलाडूवृत्ती दाखवण्याची गरज भासेल. त्यामुळे आतापासूनच त्याचा सराव करणे फायद्याचे ठरेल. एखादी छोटीशी सहल घडेल. कोणत्याही प्रकारचे खडतर प्रशिक्षण घेत असलेल्या व्यक्तींसाठी आज चांगला दिवस.
वृषभ – एखादी गोष्ट तुमच्यासाठी नाहीच हे लक्षात येताच तिला सोडून देणं फायद्याचं ठरतं. दिवसाच्या शेवटी एखादी आनंददायी गोष्ट घडेल. एखाद्या मुलाखतीसाठी चांगली तयारी करा. विचारले जाणारे प्रश्न तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतात.तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मिथुन – सकाळच्या वेळी फिरायला जाणे ही तुमच्यासाठी एक चांगली थेरपी सिद्ध होईल. सकाळी फिरून आल्यानंतर दिवसभर तुम्ही मानसिकरित्या अगदी फिट असता असं लक्षात येईल. आज सामाजिक कार्य करण्याची इच्छा होईल.
एखादी व्यक्ती तुमच्याशी स्पर्धा करत आहे, तेव्हा सावध रहा.
कर्क – तुमच्या झोपेच्या सवयीमध्ये सकारात्मक बदल झालेला दिसून येत आहे. एखाद्या जुन्या सहकाऱ्याकडून काही मेसेज मिळण्याची वाट पाहत असाल, तर आता मिळेल. कामाच्या ठिकाणी झालेल्या वादामुळे तुमचा मूड खराब राहील.वेळेचे चांगल्या प्रकारे नियोजन करून स्वतःलाच आश्चर्यचकित कराल.
सिंह – काही वेळा तुम्ही एक कठोर व्यक्ती बनता. लोकांच्या मनात तुमची अशीच प्रतिमा आहे. मात्र, जास्त संवाद साधल्यामुळे तुम्ही ही प्रतिमा बदलू शकाल.
एखाद्या व्यक्तीचा मत्सर तुम्हाला महागात पडत आहे. डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करून त्यांना खुश करा.
कन्या -तुम्ही बराच काळ स्वतःला व्यक्त होण्यापासून थांबवले आहे, मात्र आता खरं बोलण्याची वेळ आली आहे.तुमचा प्रवास हा अपेक्षेपेक्षा जास्त अध्यात्मिक ठरेल. तुमच्या जवळच्या मित्रांपैकी एकाला विश्वासघात झाल्यासारखे वाटेल.
तुळ – वैयक्तिक आयुष्य आणि काम या गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन असायलाच हवं असं नाही, हे लक्षात घ्या.
चांगला श्रोता बनण्याचा प्रयत्न करा. आज दुपारचे जेवण अगदी चांगले होईल.
वृश्चिक – तुमच्या भीतीवर मात करून जेव्हा तुम्ही नव्याने सुरूवात करता, तेव्हा ती तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट ठरते. कुटुंबीयांचा तुम्हाला भक्कम पाठिंबा मिळेल.
लवकरच एखादी नवीन भागीदारी सुरू कराल, ज्यामुळे भरपूर फायदा होईल. योग्य अशा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे तुमचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरेल.
धनु– आजचा दिवस अगदीच नाट्यमय ठरू शकतो. तुमच्या टीमने केलेल्या एखाद्या कामासोबतच, त्यातील तुमच्या योगदानाचेही कौतुक होईल.
दुपारपर्यंत आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. संध्याकाळ मात्र आरामदायी असेल.
मकर – अचानक बदललेल्या योजनांमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. एकाच वेळी भरपूर गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल.
ही परिस्थिती काही तासांसाठी राहील. तुमच्या आवडत्या चुलत भावंडामुळे नशीब उजळेल. संध्याकाळी शक्य झाल्यास विश्रांती घ्या.
कुंभ – तुम्ही ज्या जागेला भेट देणार आहात ती तुमच्या अपेक्षेइतकी चांगली नसू शकते.
काही दिवसांपूर्वी घेतलेल्या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची गरज आहे. आज लवकर काम संपवून एखादे चांगले पुस्तक वाचण्याबाबत विचार करा. स्वतःसाठी थोडा वेळ देऊन, उद्यापासून नवीन काम करण्यासाठी सज्ज व्हा.
मीन – तुमची जेवढी क्षमता आहे त्यानुसार काम करा, लवकरच त्याचे परिणाम दिसून येतील.तुमच्याकडे खास कौशल्य आहे, आणि तुम्ही दुसऱ्यांबाबत लवकर आश्चर्यचकित होत नाही. तुमचा ब्रेक जवळपास संपत आला आहे, त्यामुळे आता कामाचे चांगले वेळापत्रक तयार करा. सरकारी अधिकारी आणि ब्युरोक्रॅट व्यक्तींसाठी चांगला दिवस.