April 1, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेशांच्या दृष्टीने आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी आहे.नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळेल व नवीन कार्याचा आरंभ कराल. मनात शीघ्र बदल होतील व मन द्विधा बनेल. आज नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. निश्चित हेतूने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. छोटे प्रवास होतील. महिलांनी आज वाणीवर संयम ठेवावा असा श्रीगणेशांचा सल्ला आहे.

वृषभ

हाती आलेली संधी अनिर्णायकतेमुळे आपण आज गमावून बसाल आणि संधीचा लाभ घेता येणार नाही असे श्रीगणेश सुचवितात. विचारांत व्यस्त राहाल. त्यामुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. एखादे नवीन काम सुरू करणे हितावह नाही. वादविवाद अथवा चर्चेत आपल्या हटवादीपणामुळे संघर्षीची शक्यता आहे. आपल्या वाकचातुर्यामुळे इतरांना शांत करू शकाल. भावंडांमध्ये प्रेमभाव राहील.

मिथुन

श्रीगणेश यांना वाटते की आज आपल्या दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन आणि स्वस्थचित्ताने होईल. मित्र आणि नातलगांसोबत सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिक दृष्टीने लाभदायक दिवस. खर्चावर नियंत्रण ठेवा. मनातून नकारात्मक विचार काढून टाकण्याची सूचना श्रीगणेश देतात. मित्र तथा प्रिय व्यक्तिंकडून भेटवस्तू मिळाल्याने मन आनंदी बनेल.

कर्क

मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कोणताही अंतिम निर्णय घेऊ शकणार नाही. असमंजसपणामुळे मनाला यातना होतील. संबंधितांचे गैरसमज होतील. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. भांडण, मारामारी यांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. समस्या त्वरित सोडवाल. अपघातापासून सावध राहा. अविचारी वर्तना पासून दूर राहाणे हिताचे ठरेल. आरोग्य बिघडेल आणि पैसा खर्च होईल.

सिंह

आजचा दिवस फार चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी गमावाल असा इशारा श्रीगणेश देतात. मन विचारात गढून जाईल. नवे कार्य हाती घेऊ नका. मैत्रिणींची भेट होईल आणि त्यांच्याकडून लाभही होईल. मित्रांबरोबर सहलीचा बेत आखाल. त्यात फायदा होईल. धनलाभ होईल.

कन्या

गणेशजी म्हणतात की आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. नवीन कार्ये आज सफल होतील. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी फायद्याचा दिवस. त्यांना पदोन्नती मिळू शकते. वरिष्ठ अधिकार्‍याकडून फायदा होईल. पैसा, मान- सम्मान मिळेल. वडिलाकडून फायदा. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आरोग्य चांगले राहील. सरकारी कामे होतील. सरकार कडून फायदा होईल. ऑफिसकामासाठी बाहेरगावी जावे लागेल. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील.

तुळ

आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यग्र असाल, असे गणेशजी म्हणतात. नवीन कार्यारंभास शुभ दिवस दूरचा प्रवास, धार्मिक स्थळांना भेटीचा आज योग आहे. व्यवसाय धंद्यात फायदा. परदेशातील मित्रांचे समाचार मिळतील. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य सांभाळावे. संततीविषयी द्विधा मनःस्थिती राहील. विरोधका बरोबर चर्चा सुरु करण्याची सूचना श्रीगणेश देतात.

वृश्चिक

आजचा दिवस सावधतेने घालविण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. नवीन कार्याची सुरुवात करु नका. तसेच रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक कामकृत्या पासून दूर राहा. राजकीय गुन्ह्यापासून दूर राहा. नवे संबंध जोडताना गांभीर्याने विचार करा. खर्च अधिक होईल. ईश्वरी आराधना व नाम स्मरणाने फायदा होईल.

धनू

आजचा आपला दिवस आनंदात व समाधानात जाईल असे श्रीगणेश सांगतात. मनोरंजन, पार्टी, पिकनिक, प्रवास, सुग्रास भोजन व सुंदर वस्त्र प्रावरणेही आजच्या दिवसाची विशेषता असेल. रोमांचक गाठीभेटी होतील. लेखन कार्याला चांगला दिवस. बौद्धिक विचारांची देवाणघेवाण होईल. भागीदारीत फायदा. प्रसिद्धी मिळेल. वैवाहिक सुख उत्तम राहील.

मकर

व्यापार धंद्यात वाढ होईल असे श्रीगणेश सांगतात. त्यादृष्टीने पुढे वाटचाल करा. पैशाचे व्यवहार सहज होतील. घरातील वातावरण आनंदी असेल. आवश्यक ठिकाणीच पैसा खर्च होईल. नोकरीत सहकार्यांकडून सहकार्य मिळेल. व्यापार्यांना कायदेशीर त्रास संभवतो. परदेशाशी व्यापार वाढेल. शत्रूवर मात कराल. आरोग्य चांगले राहील.

कुंभ

आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करण्याची सूचना श्रीगणेश देतात. आज विचारात बदल दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत. संतती विषयी काळजी राहील. लेखन व नवनिर्माण या कामासाठी चांगला दिवस. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. अचानक खर्चाचे योग आहेत. पोटाच्या तक्रारीची काळजी घ्या.

मीन

नावडत्या घटनांमुळे आजचा दिवस उत्साहात जाणार नाही असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात वादविवाद होतील. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील. स्वास्थ्य बिघडल्याने झोप लागणार नाही. स्त्रियांबरोबर व्यवहार करताना काळजी घ्या. पैसा आणि कीर्ती यांची हानी. नोकरदारांना नोकरीत चिंता. स्थावर मालमत्ता, वाहन यासंबंधीच्या कागदपत्रांविषयी सावधानता बाळगा.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click