October 5, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष (Aries)

आजचा रविवारी कोणत्याही नवीन उपक्रमासाठी उत्तम काळ आहे. तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीपणे हाताळण्यास सक्षम असणार आहात.वाद – विवादा पासून दूर राहिल्यास कुटुंबियांशी निर्माण होणारी कटुता टाळू शकाल. खाण्या – पिण्याची काळजी घ्या नाहीतर स्वास्थ्य बिघडवू शकते.

वृषभ (Taurus)

रविवारी तुमच्या कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शक्यता आहे. तुमचं तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे.आज आपण शरीर व मनाने स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभ सुद्धा होऊ शकतो.

मिथुन (Gemini)

या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असाल. व्यवसायाचा विस्तारही होऊ शकतो. तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे.आपला आवेश व उग्रपणा ह्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. एखादा अपघात संभवतो.

कर्क (Cancer)

रविवारी तुमची चांगली कामगिरी इतरांना प्रभावित करेल. तुम्ही तुमच्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्यात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो.आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल.

सिंह (Leo)

ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा भावनिक सहभाग आणि लांबचा प्रवास टाळावा. कुटुंबातील सदस्यांमधील अस्वस्थता तुमच्यासाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.आज आपणास प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्‍यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल.

कन्या (Virgo)

रविवारी तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी व्हाल. तुम्हाला आरोग्य चांगलं राहणार आहे. शिवाय तुमचा आत्मविश्वासही खूप वाढेल.आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. नोकरीत वरिष्ठांशी आपला वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल.

तूळ (Libra)

रविवारी, तुम्ही तुमच्या संपर्कांमुळे व्यवसाय आणि व्यावसायिक संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल.टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार ह्या मुळे वाद व भांडणे होतील. क्रोध, व कामवृत्ती ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. वेळेवर जेवण न मिळणे किंवा होणारा अधिक खर्च आपल्या मनाला अस्वस्थ करतील.

वृश्चिक (Scorpio)

या शनिवारी तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत असाल आणि ही परिस्थिती तुम्हाला वेळेवर काम पूर्ण करण्यापासून रोखू शकते.आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज आपणास नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय ह्यातून भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्या कडून ही लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाऊ शकाल.

धनू (Sagittarius)

शनिवारी तुम्ही कुटुंबातील सदस्यांना तुमचं मन सांगू शकाल. यावेळी तुमच्या युक्तीने तुम्हाला कुटुंबियांकडून मदत मिळू शकेल.आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे . घरात आनंदाचे वातावरण राहील.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी तुम्ही थोडे चिंतेत राहण्याची शक्यता आहे. तुम्ही अनावश्यक गुंतागुंतीमध्ये अडकू शकता. आर्थिक समस्या सोडवण्यासही थोडा वेळ लागू शकतो.आज कला व साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. आपल्या रचनात्मक व सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. प्रेमिकांना परस्परांत गाढ प्रेमाचा अनुभव येईल.

कुंभ (Aquarius)

या रविवारी तुमच्यापैकी काहींना आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर प्रवास होऊ शकतो. कौटुंबिक वातावरणातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाचा पूर्ण आनंद घेऊ शकणार नाहीत.आज स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. स्त्रिया सौंदर्य – प्रसाधने, वस्त्र, अलंकार यांवर जास्त खर्च करतील.

मीन (Pisces)

या रविवारी नशीब चांगलं असून तुम्ही सर्व कामं उत्तम कराल. नोकरदार लोकांना कोणतंही विशेष काम यश मिळवून देऊ शकतं. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक लाभ होईल आणि प्रवासही होऊ शकतो.आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास व महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. त्यामुळे कोणतेही कार्य व्यवस्थीत करू शकाल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click