March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – मनात धार्मिक विचार राहतील. दानधर्म, पूजापाठ यांत मन रमेल. त्याप्रीत्यर्थ खर्च कराल. काहींना प्रवास करावा लागेल. नोकरीत अतिशय अनुकूल परिस्थिती राहील. एखादी मोठी संधी मिळू शकते.त्यासाठी स्वत:ला सज्ज ठेवा. आत्मविश्वासाने कामे करा.

वृषभ- धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. मनासारखी आवक राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. लोकांचे सहकार्य मिळेल. मोठ्या संधी मिळतील. उत्तम प्रवास राहील. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत तुमचे म्हणणे इतरांना पटेल. वरिष्ठंची शाबासकी मिळेल.

मिथुन – नोकरीत तुमचा प्रभाव पडेल. काही अनुकूल बदल होतील. एखादे मोठे पद मिळू शकते. त्यातून आर्थिक फायदा होईल. घरी पाहुणे येतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मोठ्या आत्मविश्वासाने प्रवास वाटचाल कराल.

कर्क – भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. अडचणी दूर होतील. दगदग कमी होईल. मनासारखे फिरणे होईल. पर्यटनाचा आनंद मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. प्रसिद्धी मानसन्मान मिळेल. चांगली बातमी मिळेल.

सिंह – अचानक धनलाभ होईल. कामचा ताण वाढेल. सतत कार्यरत रहावे लागेल. त्यामुळे आरामासाठी वेळ मिळणार नाही. नोकरीत वादापासून दूर राहा. खर्चाला आवर घातला पाहिजे. वाहनाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष द्या.

कन्या – अडचणी दूर होतील. सहजासहजी यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रेमात असणाऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेल. आर्थिक आवाक मनासारखी राहील. चैनिच्या वस्तू खरेदी कराल. सरकारी कामे मार्गी लागतील.

तूळ- घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नवीन वस्तू खरेदी कराल. महत्वाच्या कामात अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्या. पोट बिघडणार नाही, अशा बेतानेच मेजवानीवर ताव मारा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक आवाक चांगली राहील.

वृश्चिक – महत्वाच्या कामात यश मिळेल. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. काहींना प्रवास घडून येतील. यश मिळत असल्याने कुणाला हिणवून बोलू नका. जीवनसाथी चांगली साथ देईल.

धनु – घरात आनंदी वातावरण राहील. एखाद्या छोट्याशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्यानिमित्ताने इष्टमित्र, नातेवाईकांच्या भेटी होतील. नोकरीत एकंदरीत अनुकूल परिस्थिती राहील. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. महत्वाचे काम मार्गी लागेल.

मकर – जीवनसथीच्या सहयोगाने महत्वाच्या कामात सफलता मिळेल. जीवनसाथीला भेटवस्तू द्या. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासमावेत मजेत वेळ जाईल. व्यवसायात भरभराट होईल. भागीदारांचे, मित्रांचे सहकार्य मिळेल.

कुंभ- धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. मनासारखी आर्थिक आवक राहील. जमीनजुमल्याच्या व्यवहारात फायदा होईल. आवडत्या पदाचा आस्वाद घेता येईल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. महत्वाच्या कामात सफलता मिळेल.

मीन- व्यवसायात थोडे धाडस दाखवाल. अडचणी संपतील. मनात आनंदी विचार राहतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीचे प्रेम मिळेल. आर्थिक बाजू ठीकठाक राहील. वसुलीसाठी तगादा लावावा लागेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click