मेष – आज तुम्हाला अत्यंत सावध राहावं लागणार आहे.कोणत्याही बाबतीत तुम्हाला आज सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुमचा विजय होणार आहे. राजकारणात काम करणारे लोकांना आज जनतेचं प्रेम मिळेल. शारीरिक त्रासामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल, मात्र नंतर सर्व काही ठीक होईल.
वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय सामान्य असेल. तुमच्या वागण्यामुळे कुटुंबातील कोणताही सदस्य किंवा इतर लोक दुखावणार नाही याची तुम्हाला पूर्ण काळजी घ्यावी लागेल. तुमच्या बुद्धीने आणि विवेकाने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी आज फायदेशीर ठरतील. तुम्हाला तुमच्या मनातील समस्या तुमच्या जोडीदारासमोर ठेवाव्या लागतील, तरच तुम्ही त्यांचं समाधान शोधू शकाल.
मिथुन – आजचा दिवस तुम्ही धार्मिक कार्यात घालवणं पसंत कराल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज तोंड गोड ठेवूणच आपली कामं करुन घ्यावी लागणार आहेत. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांचे आज सहकाऱ्यांसोबत काही वाद होऊ शकतात, मात्र नंतर गोड वाणीमुळे तुमचे ते वादही सुटतील.
कर्क – आजच्या दिवसात तुमच्या अनेक सुखसोयींमध्ये वाढ होईल. कठोर परिश्रमाने तुम्ही तुमची कामं पूर्ण करू शकाल. तुम्हाला तुमच्या लहान भावंडांसोबत घरातली काही कामं करावी लागतील. तुम्ही तुमच्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल, त्यानंतर कुटुंबातील सदस्य तुमची प्रशंसा करताना दिसतील.
सिंह – आज तुम्ही स्वतःपेक्षा इतरांच्या कामावर जास्त लक्ष द्याल. तुमची काही कामं पूर्ण झाल्यानं तुमचा आत्मविश्वास वाढेल. मित्रांच्या मदतीनं तुम्ही एखाद्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कराल. तुमचे पालक तुम्हाला काही टिप्स देतील, त्याचं पालन केल्यास तुम्ही तुमची मानसिक चिंता थोडी कमी करू शकता.
कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा असेल. तुमच्या गोड वाणीमुळे तुमचा आदर वाढेल. तुम्हाला तुमच्या वाणीमध्ये आज गोडवा ठेवावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला शारीरिक त्रास होत असेल तर त्यातून आज तुम्हाला आराम मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते. तसंच त्यांना अपेक्षित नफाही मिळेल.
तूळ – आजचा दिवस तुमच्या प्रतिष्ठा वाढवणारा असेल. नवीन गोष्टींची सुरुवात केल्यानं तुमचं मोठं कौतूक देखील आज होईल. ऑनलाइन कामामध्ये तुमची रुची असेल. विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं काही महत्वाचे निर्णय घेऊ शकतात. भूतकाळातील चुकांबद्दल तुम्ही आज मित्रांची माफी मागू शकता.
वृश्चिक – आजचा दिवस तुमच्यासाठी मोठा खर्चीक असणार आहे. मुलांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही त्यात संयम बाळगाणं तुमच्या फायद्याचं असणार आहे. अन्यथा तुमचे शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात.
धनू – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आज विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होईल. त्यामुळे त्यांचा सन्मान होण्याची देखील शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. संध्याकाळी, तुम्ही काही धार्मिक विधींमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमचं नाव होईल. कोणताही व्यावसायिक करार अत्यंत काळजीपूर्वक विचार करून करावा लागेल.
मकर – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असेल. न विचारता कोणालाही सल्ला देणं टाळावं लागेल, अन्यथा त्याचा तुमच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या पैशातील काही भाग धार्मिक कार्यात खर्च कराल. कुटुंबीयांकडून तुमच्या नावावर काही मालमत्ता केली जाऊ शकते.
कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत चांगला असेल. तुमच्या संपत्तीत आज मोठी वाढ होईल. विद्यार्थी आपल्या कमकुवत विषयांवर कठोर परिश्रम करून परीक्षेत यश मिळवू शकतील. तुमचा कुटुंबीयांशी तुमचे एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. कुटुंबासोबत कोणत्याही मालमत्तेशी संबंधित वादात पडणे आज टाळा.
मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असेल. नोकरीत तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावध राहावं लागेल, कारण ते आज तुमचा पराभव करू शकतात. मित्रांसोबत कुठेतरी जाण्याची तुमचा प्लॅन आज यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुम्ही काहीसे नाराज असाल. मागच्या काही दिवसांपासून अर्धवट राहिलेली कामं आज पूर्ण होतील.