मेष
नोकरदारांसाठी प्रमोशन मिळेल. आरोग्यासंबंधी काळजी घ्यावी. अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांसंबधित बातमी मिळेल. एखाद्या ठिकाणी बाहेर जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. नोकरदार लोकांसाठी दिवस सामान्य आहे. व्यवसायात लाभाची अपेक्षा करू शकता.
वृषभ वृषभ राशि जातकांसाठी आजचा दिवस धार्मिक स्थळं व जवळचे प्रवास घडून येतील. शैक्षणिक क्षेत्रातील मित्रांना आनंदी घटना कानावर पडतील. थोर व्यक्तींच्या भेटी घडून येतील. घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील.
मिथुन मिथुन राशीच्या जातकांनी वाद-विवाद टाळावा. घेतलेल्या निर्णयाबद्दल द्विधा मनस्थिती होण्याची शक्यता. निर्णय डळमळू देऊ नये. नातेवाईकांच्या मित्र-मैत्रिणींच्या भेटी घडून येतील. पोटाच्या तक्रारी उद्भवतील.
कर्क – कर्क राशीचे जातकांना आजचा दिवस निराशाजनक जाईल. पारिवारिक चिंता निर्माण होईल. परंतु, योग्य व्यक्तीकडून सल्ला घेऊन केलेली कामाची सुरुवात फायद्याची ठरू शकते. काम करताना चिडचिड होईल. परंतु, संयम राखावा.
सिंह – सिंह राशी जातकांसाठी आजचा दिवस नवीन प्रवास घडवून आणेल. नवनवीन संधी निर्माण होतील, प्रतिष्ठा व मान मिळेलं. योग्य मार्गदर्शन मिळेल. वरिष्ठ सदस्यांमार्फत प्रशंसा होईल.
कन्या– कन्या राशी जातकासाठी आजचा दिवस आनंदी स्वरूपाचा असेल. केलेले कष्टाचा फायदा मिळण्याची वेळ आली आहे. चिडचिड होऊ न देता शांत निर्णय फायद्याचे राहतील.
तूळ : आज तुम्ही मनोरंजन आणि प्रवासात वेळ घालवाल. तब्येत आणखी बिघडण्याची शक्यता आहे. सांसारिक बाबतीत तुमचे वर्तन थोडे उदासीन राहील. जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. मित्र आणि प्रेम-भागीदारांची भेट अधिक आनंददायी होणार नाही. सार्वजनिक जीवन आणि सामाजिक जीवनात कमी यश मिळेल.
वृश्चिक : नवीन नातं सुरू करू नका, तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आज तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. विनाकारण कोणाच्या वादात पडून बदनामी होण्याची शक्यता आहे. शक्य असल्यास प्रवास टाळा. मात्र, दुपारनंतर तुमची परिस्थिती बदलेल आणि तुमचे विचार सकारात्मक होतील.
धनु : शरीरात आणि मनात ताजेपणाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कुटुंबात कोणाशी वाद होऊ शकतो. जोडीदारासोबत विचारांचे संतुलन ठेवा. लव्ह-बर्ड्सना आपल्या प्रेयसीसोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल. सार्वजनिक कार्यक्रमात मौन बाळगावे.आज महत्त्वाचे काम करू नका. नवीन संबंध वाढवणे टाळा
मकर : दैनंदिन कामात अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर तुम्हाला आराम वाटेल. जोडीदारासोबतचे जुने मतभेद दूर होतील आणि घरगुती जीवनातील समस्या सुटताना दिसतील. प्रेयसीला भेटेल. विरोधकांच्या पुढे जाऊ शकाल. नवीन काम, नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.
कुंभ : बोलण्यावर संयम ठेवल्यास आज अनेक समस्यांपासून वाचाल. कोणाशीही वादात पडू नका. कामात कमी यश मिळेल. लव्ह-लाइफमध्ये आज असंतोषाची भावना राहील. तब्येत खराब राहील. लव्ह-बर्ड्स, हा दिवस संयमाने घालवा. घाईमुळे तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, सायंकाळनंतर परिस्थिती बदलेल.
मीन : आज, प्रेम-जीवनात नकारात्मक विचार तुम्हाला त्रास देऊ शकतात. रागाच्या भरात किंवा उत्साहात लोकांशी बोलू नका. आज कोणाशी वाद होऊ शकतो. आज मित्र, नातेवाईक आणि प्रेमीयुगुल यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मध्यम राहील. नकारात्मक विचारांमुळे मन उदास राहू शकते. व्यापार्यांसाठी दिवस सामान्य राहील.