मेष – आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्नेही, स्वकीय व मित्रांसह सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांकडून लाभ होतील.त्यांच्यासाठी पैसा सुद्धा खर्च करावा लागेल.
वृषभ – आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कामाच्या योजना यशस्वीपणे आखू शकाल. नोकरी – व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील.
मिथुन – आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने आपल्या कामास विलंब होईल. शरीरात स्फूर्ती व मनात उत्साह असणार नाही. पोटाचे विकार सतावतील. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल.
कर्क – आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेरील पदार्थांच्या खाण्या पिण्यामुळे आरोग्य बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी भांडण होईल. नवे संबंध त्रासदायक ठरतील.
सिंह – आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज पती – पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याची शक्यता आहे.
कन्या – आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपणास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. कुटुंबातील शांती – सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ व कामात यश मिळेल.
तूळ – आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग आपण कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. तन व मन तरतरी व स्फूर्तीचा अनुभव घेईल.
वृश्चिक – आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक दृष्टया भीतीचा अनुभव आपण घ्याल. आज कोणती ना कोणती चिंता सतावेलच. कुटुंबीय, नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही.
धनु – आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणास गूढ व रहस्यमय विषयांची गोडी लागल्याने त्या विषयात खोलवर उतरण्याचा आपण प्रयत्न कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रकृती उत्तम राहील व मन प्रसन्न राहील.
मकर – आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपली उक्ती व कृती यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. शेअर – सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल.
कुंभ – आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील.
मीन – आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहावे लागेल. एकाग्रता कमी असल्याने आपण बेचैन राहाल. मंगल कार्यावर खर्च होईल.