October 5, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवणे तसेच राग द्वेषापासून दूर राहणे हितावह राहील. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय व गूढ विषयांचे आकर्षण राहील. नवीन कार्ये हाती घेतल्यास त्यात सुद्धा अडचणी येतील. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.

वृषभ –  आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे असल्याचे आपणास जाणवेल. कुटुंबीय व स्नेहीजनांसह प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. त्याच बरोबर छोटया प्रवासाचे बेत आखाल. परदेशात राहण्यार्‍या संबंधिताकडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला आनंद होईल. अचानक धनलाभ संभवतो.

मिथुन – आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणांस यश व कीर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील. स्वभावात रागाचे प्रमाण मात्र वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कर्क – आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील. आज यात्रा, प्रवास किंवा नवीन कामाची सुरुवात करणे हितावह होऊ शकणार नाही. पोटाच्या व पचनाच्या तक्रारी त्रास देतील.

सिंह –  आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज कुटुंबातील वातावरण वाद – विवादाचे राहील. कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार येऊन उदासीनता जाणवेल. आजचा दिवस जमीन, घर, वाहन इत्यादी व्यवहार करताना हस्ताक्षर करण्यास अनुकूल नाही. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहा.

कन्या –  आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसह वेळ आनंदात जाईल. त्यांच्या कडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. नशिबाची साथ मिळेल. आपले नुकसान टाळण्यासाठी कोणतेही काम विचार पूर्वकच करावे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.

तूळ – आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपली द्विधा मनःस्थिती राहिल्याने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. तसेच नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबीयांशी वाद होणार नाहीत. जिद्द सोडून समाधानाने राहावे लागेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

वृश्चिक – आज आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. एखादी चांगली बातमी मिळेल. स्नेही व मित्रवर्ग यांच्या कडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. आनंददायी प्रवास घडेल. दांपत्य जीवनात गोडी अनुभवाल. सामान्यतः संपूर्ण दिवस खुशीत जाईल.

धनू – आज चंद्र आपल्यासाठी बारावा स्थानी असेल. आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उदभवतील. स्वभावात रागीटपणा येऊन वाद होतील. आरोग्यास त्रास संभवतो. वर्तन व बोलणे संयमित ठेवावे लागेल. एखादा अपघात संभवतो. फुटकळ कामातून मनःशांती भंग पावेल.

मकर – आज आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. मित्र व स्नेहीजनांचा सहवास घडल्याने आजचा दिवस आनंदात जाईल. सामाजिक क्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रातही आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे. विवाहेच्छुकांना जोडीदाराची निवड सहजपणे करता येईल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. घरात एखादे मांगलिक कार्य होईल.

कुंभ – आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. त्यामुळे मोठे यश मिळू शकेल. वरिष्ठ व वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळाल्याने मनावरील ताण कमी होईल. गृहजीवन आनंदी राहील. मान – मरातब वाढतील.

मीन –  आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. मनातील दुःख व अशांतता ह्याने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांशी वाद संभवतात. संतती विषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. पोटाची तक्रार राहील. नशिबाची साथ लाभणार नाही. मनात नकारात्मक विचार येतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click