April 1, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष- प्रवास लाभदायी ठरेल. बाहेरचे पदार्थ टाळा. आरोग्याची काळजी घ्या. एखादी शुभवार्ता तुम्हाला कळेल. रागावर ताबा ठेवा. तिखट तेलकट पदार्थ टाळा. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका.

वृषभ – छोट्या गोष्टींमुळे मित्रांसोबत भांडू नका. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु नका. तोटा होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसमवेत एखाद्या नव्या गोष्टीचा अनुभव घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत.

मिथुन- बहिणीला एखादी भेट वस्तू द्या. संध्याकाळपर्यंत व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असाल तर आज चांगली संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरीच्या नव्या संधी तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे.

कर्क- दिवस व्यस्त असणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी असणारे मतभेद आणि गैरसमज आज दूर होणार आहेत. वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. आज तुमच्या कामाचं चीज होणार आहे.

सिंह- वडिलांसोबत वाद घालू नका. स्वतःचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न करा. दुपारनंतर दिवस उत्तम आहे. जोडीदाराच्या मदतीनं आज तुम्ही एक मोठा टप्पा ओलांडणार आहात. आयुष्याच्या सुखद पर्वाची आजपासून सुरुवात होणार आहे.

कन्या- मित्रांसोबत भेट होईल. आजची कामे उद्यावर टाकू नका. आवडीचे पदार्थ खाण्याचा आणि इतरांना खाऊ घालण्याचा आज दिवस आहे. कोणत्यागी गोष्टीची अती चिंता बरी नाही. वर्तमानात जगा.

तुळ- सहकाऱ्यांसोबत प्रवासाचा योग आहे. मनासरख यश मिळण्याची शक्यता आहे. मोठ्यांचं अपमान करु नका. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचा शोध आज अखेर संपणाकर आहे.

वृश्चिक – व्यवसायात कोणाची फसवणूक करु नका. कुटुंबाची साथ द्या. अती राग करु नका. परिस्थितीचा सारासार विचार करुन निर्णय घ्या. मोठ्यांचा सल्ला आणि त्यांचे आशीर्वाद आज तुम्हाला नव्या वाटेवर नेणार आहेत. त्यांची साथ सोडू नका.

धनु- दिवसाची सुरुवात चांगली असेल. व्यवहार विचार करुन करा. तरुणांनी नव्या वादांमध्ये न अडकलेलं बरं. नव्या घराचा विचार कराल. ते खरेदी करण्याचाही विचार कराल. आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळं मोठा दिलासा असेल.

मकर – आपल्या लोकांची साथ मिळेल. वडिलांचा सल्ला आज तुम्हाला मोठं यश देणार आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. मोठ्यांचा सल्ला आणि त्यांचे आशीर्वाद आज तुम्हाला नव्या वाटेवर नेणार आहेत. त्यांची साथ सोडू नका.

कुंभ- धनलाभाचा योग आहे. नोकरीमध्ये आजचा दिवस बरंच यश आणणारा ठरेल. वरिष्ठांकडून शाबासकीची थाप मिळेल. कामातून वेळ काढून स्वत:लाही वेळ द्या. आरोग्याची काळजी घ्या.

मीन- नवी आणि जास्त पगाराची नोकरी आज तुमच्या वाट्याला येणार आहे. संधी ओळखा, तिचं सोनं करा. वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवा. समाजात मान सन्मान वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click