January 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यासाठी आपण खूप उत्साही राहाल असे श्रीगणेश सांगतात.शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हा उत्साह द्विगुणित करेल. स्नेही, मित्रपरिवार आणि स्वकीय यांच्यासमवेत स्नेहसंमेलन, समारंभाला जाणे होईल. दुपारनंतर मात्र काही कारणास्तव आपल्या तब्बेतीची तक्रार राहील. खाण्या- पिण्याकडे लक्ष द्या. पैशाच्या देवाण- घेवाणी संदर्भातही सावध रहा. मनाची उदासीनता नकारात्मक भावना निर्माण होऊ देणार नाही याकडे लक्ष द्या. मध्यम फलदायी स्वरूपाचा दिवस राहील.

वृषभ

कुटुंबातील व्यक्तींसमवेत आपण सल्ला- मसलत कराल. गृहसजावट आणि इतर बाबींमध्ये बदल करण्यात आवड निर्माण होईल. आईशी मनमोकळेपणा वाढेल तसेच कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध सुधारतील. दुपारनंतर आपण सामाजिक कार्यात जास्त रस घ्याल. मित्रांकडून लाभ होईल. स्वकीयांशी संपर्क वाढेल आणि त्यांच्याशी संबंध सुधारतील. संततीकडून लाभाची शक्यता. नवी मैत्री मनाला आनंद देईल. श्रीगणेश सांगतात की अचानक धनलाभाची शक्यता आहे.

मिथुन

कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णयाप्रत स्थिति येईल. कामाचा व्याप वाढल्याने तब्बेतीची कुरकुर वाढेल. परंतु दुपारनंतर मात्र तब्बेतीत सुधारणा होईल. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. त्यांच्यासह सहलीला जाण्याचा बेत आखाल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.

कर्क

श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस न्यायपूर्वक राहील. नियोजित कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रयत्नांती असा अनुभव येईल की केलेले प्रयत्न व्यर्थ गेलेत. तब्बेत बिघडू शकते. संताप वाढेल. दुपारनंतर मात्र शारीरिक उत्साह आणि मानसिक खंबीरता यांमुळे आनंदी राहाल. व्यवसायात वरिष्ठांशी महत्त्वाची चर्चा होईल. गृहसजावटीत स्वास्थ्य घ्याल आणि काही बदल करण्याची इच्छा होईल.

सिंह

आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक आणि मानसिकदृष्टया बेचैन आणि व्यग्र राहाल. संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरात आनंदी वातावरण राहील. व्यापार- धंद्यात उच्च अधिकार्र्यांशी महत्त्वाची चर्चा होईल. कुटुंबीयांबरोबरही महत्त्वाच्या विषयावर विचारविनिमय कराल.

कन्या

आज नवीन कार्यारंभ किंवा प्रवास करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. प्रेम आणि तिरस्काराच्या राग, द्वेष इ. भावना सोडून समानतेने काम करण्याचा आजचा दिवस आहे. आध्यात्मिक क्षेत्रात सिद्धी प्राप्त होण्याचे योग आहेत. तब्बेतीच्या कुरकुरीमुळे व्यग्र राहाल. संताप वाढेल पण त्यामुळे आपले काम बिघडणार नाही याकडे लक्ष द्या. व्यवसायक्षेत्रात कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. धार्मिक समारंभात भाग घ्याल.

तुळ

आज दिवसाची सुरुवात आनंददायक असेल असे श्रीगणेश सांगतात. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. आर्थिक लाभ तसेच प्रवासाची शक्यता. पण दुपारनंतर, सायंकाळी अनर्थ होऊ नये यासाठी वाणीवर संयम ठेवा. हितशत्रूंपासून सावध रहा. नवे कार्य आज सुरू करू नका.

वृश्चिक

बौद्धिक कार्य, जनसंपर्क आणि इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. असे श्रीगणेश सांगतात. जवळचा प्रवास घडेल. धन विषयक आराखडा बनविण्यासाठी वेळ शुभ आहे. दुपारी वा सायंकाळ नंतर मित्र आणि संबंधितांसह प्रवासाचे नियोजन कराल. खाण्या-पिण्याचा आस्वाद घ्याल. वैचारिक पातळीवर अतिउत्साहाला आवर घालण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कुटुंबात आनंदाची छटा पसरेल.

धनू

शारीरिक आणि मानसिक स्वास्थाच्या दृष्टीने जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खूप परिश्रमानंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. सहल प्रवास शक्यतो टाळा. दुपारनंतर अनुकूल वातावरण. शरीरात उत्साह संचारेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ. व्यावसायिक नियोजन योग्य प्रकारे कराल. बाकी वेळ आनंदात जाईल.

मकर

आज आपण फारच संवेदनशील राहाल असे श्रीगणेश सांगतात. भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. संकटात टाकणारे विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहा. कोणत्याही गोष्टीत घाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबीयांशी परस्परांत मतभेद वाढणार नाहीत याकडे लक्ष द्या. कार्यपूर्तीसाठी आज कठोर परिश्रम घ्यावे लागतील.

कुंभ

महत्त्वाच्या कामाचा निर्णय आज घेऊ नये असे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. दुपारनंतर मानसिक व्यग्रता वाढेल. संपत्ती विषयक दस्तऐवज करण्यास वेळ अनुकूल नाही. विद्यार्थ्यांसाठी मध्यम स्वरुपाचा दिवस. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. आपली भावना दुखावली जाईल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

मीन

स्वार्थी वृत्तीने काम करण्याचा मोह टाळून अन्य विषयाचा विचार करण्याची सूचना गणेशजी देत आहेत. घर, कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी आपणांस वातावरण अनुकूल राहील. जिभेवर संयम ठेवून आपण वादविवाद किंवा मनस्ताप टाळू शकाल. परिस्थिति सुधारणा होईल. नवीन कार्य करण्याचा उत्साह वाढेल आणि कार्यारंभही करू शकाल. पण दविधा मनःस्थिति निर्णय घेऊ नका. कामानिमित्त छोटासा प्रवास घडेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click