March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा आपला दिवस आध्यात्मिक दृष्टीने वेगळा अनुभव देणारा ठरेल.गूढ आणि रहस्यमय विद्या आत्मसात करण्यात गोडी वाटेल. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता आहे. नवीन कामाचा आरंभ करण्यास दिवस चांगला नाही. प्रवासात अचानक संकटे येतील. क्रोध आणि वाणीवर संयम ठेवा. हितशत्रू तुमचे काही नुकसान करू शकणार नाहीत याकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात.

वृषभ

दांपत्यजीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाल आणि दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसोबत उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. विदेशातील मित्रांकडून बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. व्यापार्‍यांना व्यापारात वृद्धी होईल. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत यश आणि प्रतिष्ठा मिळेल.

मिथुन

श्रीगणेश सांगतात की कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. घरात सुखाचे आणि शांतीचे वातावरण राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज खर्च होईल पण तो अनावश्यक वाटणार नाही. अडलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग सापडेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातील रागावर आवर घालण्याची आवश्यकता आहे.

कर्क

अगदी शांत राहून आजचा दिवस घालवा अशी सूचना श्रीगणेश देतात. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उद्भवतील. प्रेमिकांमध्ये वादविवाद होऊन मतभेद होतील. भिन्न लिंगीय व्यक्तीबद्दलचे आकर्षण संकटात टाकेल. यात्रा, प्रवास किंवा नवीन कामाची सुरुवात करणे हिताचे ठरणार नाही. पोटाच्या आणि पचनाच्या तक्रारी त्रास देतील.

सिंह

श्रीगणेश सांगतात की आज परिवारात मतभिन्नतेचे वातावरण राहील. कुटुंबाशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार येतील. त्यामुळे उदासीनता जाणवेल. जमीन, घर, वाहन इ. व्यवहार करताना हस्ताक्षर करण्यास दिवस चांगला नाही. नोकरदारांना पण दिवस चांगला नाही. स्त्री वर्ग आणि पाण्यापासून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

कन्या

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसमवेत वेळ आनंदात जाईल. त्यांच्याकडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांची चाल हाणून पाडाल. भाग्योदयाचा योग असूनही एखाद्या कामात अविचाराने पाऊल टाकाल त्यामुळे हानी होईल असा सावधानतेचा इशारा श्रीगणेश देत आहेत. गूढ आणि आध्यात्मिक बाबतींत सिद्धी प्राप्त होईल.

तुळ

आज द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका असे श्रीगणेश सांगतात. नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवा. त्यामुळे कुटुंबीयांशी वादविवाद होणार नाहीत. जिद्द सोडून समाधानने राहावे लागेल. आर्थिक लाभाची शक्यता. तब्बेतीकडे लक्ष द्या.

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की आज कुटुंबात आनंदात दिवस घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील. प्रिय व्यक्तींशी भेट सफल आणि आनंददायक ठरेल. एखादी शुभवार्ता मिळेल. स्नेही आणि मित्रवर्ग यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. आनंददायी प्रवास घडेल. दांपत्यजीवनात गोडी अनुभवाल. सामान्यतः संपूर्ण दिवस खुशीत जाईल.

धनू

आजचा दिवस कष्टप्रद जाईल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध आणि आवेश राहील. त्यामुळे कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. तब्बेत बिघडेल. बोलणे आणि वागणे यांवर संयम ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. दुर्घटनेपासून जपा. पैसा जास्त प्रमाणात खर्च होईल. न्यायालयाशी संबंधित कामकाजात जपून पावले उचलावीत.

मकर

श्रीगणेश म्हणतात की आजच्या लाभप्राद दिनी एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस शुभ आहे. शेअर- सट्टा या मध्ये धन लाभ होईल. मित्र आणि संबंधित यांच्याशी भेट झाल्याने आनंद वाटेल. सामाजिक क्षेत्रात, नोकरी व्यवसायात लाभ होईल.

कुंभ

श्रीगणेशाच्या आशीर्वादा बरोबरच वरिष्ठ अधिकारी आणि वयोवृद्धांची आपणावर कृपादृष्टी राहील. आपली सर्वकामे अगदी सरळपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक दृष्ट्या शांतता लाभेल. तब्बेत चांगली राहील. मान- सन्मान वढेल. गृहस्थी जीवनात आनंदाचा अनुभव येईल.

मीन

श्रीगणेश सांगतात की आज शरीर आणि मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजीत टाकील. नोकरीत उच्च पदाधिकार्‍यांशी वादविवाद होतील आणि त्यांची नाराजी ओढवून घ्याल. प्रतिस्पर्धी खंबीर बनतील. नकारात्मक विचार मनाला घेरून टाकतील. सरकार कडून एखादा त्रास उद्भवेल. मुलाशी मतभेद होतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click