मेष
आजचा दिवस आनंददायक राहील असे श्रीगणेश सांगतात.लक्ष्मी प्रसन्न झाल्यास आर्थिक योजना पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात कार्य घडेल. जनसंपर्क वाढेल. क्षेत्राबाहेरील लोकांशीपण संपर्क येईल. बौद्धिक कार्यात रुची वाढेल. जवळपासचे प्रवास घडतील. सेवा कार्यासाठी दिवस चांगला आहे. शारीरिक आराम आणि मानसिक प्रसन्नता लाभेल.
वृषभ
वैचारिक पातळीवर थोरपणा आणि गोड वाणी यांमुळे इतरांवर प्रभाव पडेल. तसेच त्यांच्याशी संबंधामध्ये सुसंवाद निर्माण होतील. बैठका, चर्चा यातही आपणाला यश मिळेल. कष्टाचे अपेक्षित फळ न मिळूनही आपण त्या क्षेत्रात प्रगती पथावर राहाल. पचनसंस्थे संबंधी तक्रारी वाढून त्रास होईल. शक्यतो घरच्या खाण्याला प्राधान्य द्या. अभ्यासात आवड वाढेल.
मिथुन
आज मनाची स्थिती दोलायमान राहील असे श्रीगणेश सांगतात. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आईविषयी अधिक भावनाशील राहाल. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण वादविवाद टाळा. कौटुंबिक आणि स्थावर संपत्ती विषयी चर्चा न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. स्वकीय आणि स्नेही यांच्याबरोबर ताण- तणाव वाढेल. प्रवास करू नका.
कर्क
भावांकडून आज लाभ होईल असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. मित्रांची भेट आणि स्वकीयांचा सहवास याचा आनंद लाभेल. रम्य स्थळी प्रवासाला जाण्याची शक्यता. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. भावनेला प्राधान्य दिल्याने संबंध सुखदायक राहतील. भाग्योदयाचे प्रसंग येतील. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सन्मान मिळतील.
सिंह
विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसमवेत चांगले वातावरण राहील्याने आपली प्रसन्नता वाढेल. असे श्रीगणेश सांगतात. दूरस्थ व्यक्ती किंवा संस्था यांच्याबरोबरचे संबंध दृढ होतील की ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. अधिक खर्च होण्यापासून जपा. निर्धारित कामात अपेक्षे प्रमाणे यश मिळणार नाही. दिवस मध्यम जाईल.
कन्या
आजचा दिवस फारच आनंदात जाईल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही आणि प्रसन्न राहाल. लक्ष्मीची कृपादृष्टी राहील. मित्र आणि स्नेह्यांची भेट आनददायक राहील. प्रवासातही आनंद वाटेल.
तुळ
क्रोधावर नियंत्रण ठेवा. शक्यतो वाद टाळावेत. घरातील व्यक्तींशी एखाद्या विषयावर वादविवाद होतील. तब्बेत बिघडेल. विशेषतः डोळ्यांची निगा राखा. अपघाताची शक्यता. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात लक्ष द्या. मानहानी होऊ नये यासाठी दक्षता घ्या. अध्यात्म आणि ईश्वरभक्ती मनाला शांती मिळवून देईल.
वृश्चिक
आजचा दिवस आप.णाला लाभदायक आणि शुभफल प्राप्तीचा ठरेल. सांसारिक सुख मिळेल. विवाहोत्सुकांना विवाहयोग आहेत. व्यवसायात विशेष लाभ होतील. वरिष्ठ अधिकारी आपल्यावर संतुष्ट राहतील. मित्र भेटतील. तसेच रम्य स्थळी प्रवासाला जाण्याची शक्यता वाटते.
धनू
आजचा दिवस आपणाला शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यापार विषयक योजना आखाल. दिवस आनंदात जाईल. व्यापारा निमित्ताने प्रवास घडतील. उच्च आधिकार्याकडून लाभ होईल. पदोन्नती मिळेल व मान सम्मान होतील. वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होईल.
मकर
श्रीगणेश आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी दर्शवितात. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्यविषयक कार्य व्यवस्थित पार पडेल. त्यासाठी नियोजन कराल. सरकारी कामात प्रतिकूलता जाणवेल. शरीरात थकवा जाणवेल व मनःस्थिती पण ठीक राहणार नाही.
कुंभ
निषेधात्मक आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. विचार आपणाला त्रास देतील. त्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. राग जास्त वाढणार नाही याचा संयम बाळगा. कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कामांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. ध्यानधारणा आणि आध्यात्मिकता आपल्या मनाला शांती बहाल करतील.
मीन
श्रीगणेशजी सांगतात की आजच्या या दिवशी आपण मनोरंजन आणि आनंदात दंग राहाल. कलाकार, लेखक इत्यांदीना आपली प्रतिभा प्रकट करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारीसाठी चांगली वेळ आहे. स्वकीय आणि मित्रांसमवेत पर्यटनाचा आनंद लुटाल. वैवाहिक जीवनात जवाळीक आणि माधुर्य येईल. समाजात प्रसिद्धी मिळेल.