मेष (Aries) :
कार्यालयीन ठिकाणी सर्वांना चांगली वागणूक द्याल. सहकाऱ्यांकडून वेळोवेळी सहकार्य मिळेल
पाल्यांकडे लक्ष द्या. तुमच्यापैकी काही लोक चांगले संपर्क वाढवतील. व्यवसायाच्या संदर्भात दूरचा प्रवास करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात नवीन नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असतील तर हमखास यश मिळेल. पैशाची आणि प्रेमाची आवक उत्तम राहील.
वृषभ (Taurus) :
आज तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. न्यायालयीन कामात यश मिळेल. खाण्यापिम्यावर थोडं लक्ष द्या. चारही बाजूने आनंदाची बातमी मिळू शकते. शारिरीक सुस्ती संपेल. दिवसाची सुरुवात व्यवसायाच्या संदर्भात एखाद्या नवीन उपक्रमाने होऊ शकते. तुम्ही नवीन करार निश्चित करू शकता जे भविष्यात खूप फायदेशीर ठरेल. लोकांकडून मान-सन्मान मिळेल. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करा.
मिथुन (Gemini) :
नशिब तुमच्यासोबत आहे. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तर व्यावसायिकांना नवं डिल मिळू शकतं. पैसांचा सदुपयोग करा, मित्रांसोबत व्यर्थ खर्च टाळा. कुंटुंबातील मंगळकार्यात सहभागी व्हाल. अविवाहितांसांठी नवे लग्नप्रस्तावही येऊ शकतात. संपूर्ण दिवस चांगला जाईल. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला हुशारीने सामना करावा लागेल. मालमत्तेत केलेली गुंतवणूकीतून अपेक्षित परतावा मिळणार नाही.
कर्क (Cancer) :
आज अचानक तब्येत बिघडू शकते, ज्यामुळे संपूर्ण दिवस अस्वस्थ वाटेल, तेव्हा योग्य ती काळजी घ्या. अपेक्षेप्रमाणे तुम्ही ठरवलेली कामं पूर्ण होतील. वादग्रस्त आणि हट्टी असू शकता. कुटुंबियांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आव्हानत्मतक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबियांसह तीर्थयात्रेला जाण्याचा योग आहे. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल.
सिंह (Leo) :
तुमच्या क्षेत्रात यशस्वी व्हाल. पैसे योग्य आण गरजेच्या वस्तूंवर खर्च होतील. विद्यार्थी परीक्षेत अपेक्षिक कामगिरी करतील, मात्र मनात भिती असेल. उधार देऊ नका. व्यवसाय आणि आर्थिक बाबींबाबत दिवस संमिश्र स्वरुपाचा आहे. मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या शत्रूंनी निर्माण केलेल्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अधिकाऱ्यांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. त्यांचा विरोध करु नका. आरोग्यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
कन्या (Virgo) :
भाग्य तुमच्यासोबत आहे. व्यापार आणि व्यवसायासाठी दिवस उत्तम आहे. व्यापारी वर्गाला चांगले परिणाम मिळतील, ज्यामुळे धनलाभ होण्याची संधी आहे. कामाच्या ठिकाणी मोठे बदल होऊ शकतात. कुटुंबियांच्या दृष्टीने बेफिकीर असाल. प्रेमप्रकरणात गुंतलेले लोक त्यांच्या जोडीदाराच्या भावना पूर्णपणे अनुभवू शकतील. नोकरी शोधणाऱ्यांना यशस्वी होण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील.
तूळ (Libra) :
अस्वस्थता वाटेल. प्रकृती स्थिर नसल्याने तुम्हाला अस्वस्थ असल्याचं जाणवेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही. नोकरदार वर्गा कामात आलेल्या मोठ्या बदलांमुळे अडचणीत असतील. व्यापारी वर्गासाठी परिस्थिती साधारण असेल. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्ही उत्साही असाल. विचारपूर्वक घेतलेले निर्णय दीर्घकाळ प्रभावी राहतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा शक्य आहे.
वृश्चिक (Scorpio) :
आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मित्रांसोबत संवाद होऊ शकतो. मन प्रसन्न राहिल. दिवस चांगला जाईल. संघर्षपूर्ण स्थितीचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला इतरांसोबत व्यावसायिक व्यवहार करण्याची संधी मिळेल. तुमची लोकप्रियता वाढेल. व्यवसायातून तुमची कमाई वाढेल. अधिकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमी युगुलांसाठी वेळ शुभ नाही.
धनु (Sagittarius) :
दिवसाची प्रसन्न सुरुवात होईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. नोकरीत धनलाभ होईल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यापऱ्यांसाठी अनुकूल वेळ आहे. तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. तुमची बचत तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरेल.
मकर (Capricorn) :
तुम्ही दिवसभर उत्साही असाल. कुटुंबियांसोबत खूप वेळ व्यतीत कराल. कामात धनलाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. भाग्याची साथ मिळेल. आजचा दिवस शुभ आहे. काहींना गुणवत्तेनुसार बढती मिळू शकते. लग्न किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात जाण्याचीही शक्यता आहे. जर तुम्ही पुन्हा परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर लवकरच या दिशेने पावले उचला.
कुंभ (Aquarius) :
कुटुंबियासोबत वेळ व्यतीत कराल. त्यांना काय हवंय काय नको, याची काळजी घ्याल. विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होतील. प्रभावशाली लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल. तुम्ही नवीन भागीदारी करू शकता आणि तुमचा नफा वाढवू शकता. कामानिमित्त परदेशात जायचे असेल तर प्रयत्नपूर्वक पुढे जा.
मीन (Pisces) :
सर्वांसोबत प्रेमाने वागाल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. समाजाकडून मान सन्मान मिळेल. कार्यालयीन ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. पदोन्नती मिळू शकते. बुद्धिमत्तेमुळे सर्व कामं चांगल्या पद्धतीने कराल. प्रभावी आवाज असल्यामुळे तुमचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवू शकाल. व्यवसायात चांगले काम करून भरपूर नफा कमवू शकाल. प्रवासातही फायदा होईल.