मेष – घेण्यापेक्षा देण्यात आनंद माना. भावंडांना मदत करा. प्रेमसंबंधात भावनांचा अतिरेक करू नका. जोडीदाराच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न कराल.कोणतेही काम जबाबदारीने कराल. अनावश्यक विचारांना मनात थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा.
शुभरंग : हिरवा
वृषभ – आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. चिडचिड करू नका शांत राहायला शिका. इतरांना दोष देऊ नका. प्रयत्नांची कास सोडू नका. कार्यक्षमता वाढीस लागेल. जोडीदारासोबत सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. कोणताही निष्कर्ष उगाच काढू नका.
शुभरंग : किरमिजी
मिथुन – व्यावहारिक बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. अडचणीतून मार्ग निघेल. अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवू नका. कामाचे सुयोग्य नियोजन करावे लागेल. विचारांना संधी द्या. आपल्या मतांचा पगडा कोणावरही लादू नका. समस्या कशा दूर होतील, याकडे लक्ष केंद्रित कराल. घरात कोणताही तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या.
शुभरंग : चंदेरी
कर्क – इतरांच्या सल्ल्यामुळे निर्णय बदलू नका. कुटुंबाला वेळ द्याल. कोणत्याही बातमीची शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका. इतरांचा आदर करा. आपल्या मनातील नाराजी काही वेळा व्यक्त न करणे चांगले असते. सकारात्मक विचार करा. जोडीदाराच्या भावना समजून घ्या.
शुभरंग : पोपटी
सिंह – प्रवासामुळे चांगल्या ओळखी होतील. निषिद्ध गोष्टी कटाक्षाने टाळा. आर्थिक व्यवहारातील बोलणी सावधपणे करावी लागतील. पैशांचे व्यवहार करताना माणसांची योग्य पारख करा. प्रिय व्यक्तिच्या भावनांचा आदर करा.
शुभरंग: खाकी
कन्या – स्वत:ची ओळख आपल्या कामातून निर्माण कराल. इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहू नका. आरोग्याची काळजी घ्या. घरात वादविवाद करू नका. कोणाशीही संघर्ष होणार नाही, याची दक्षता घ्या. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. प्रवासात कागदपत्रे सोबत ठेवा. नको तिकडे साहस करायला जाऊ नका.
शुभरंग : चॉकलेटी
तूळ – हितचिंतकांच्या सल्ल्याने निर्णय घ्याल. महत्त्वाची कागदपत्रे काळजीपूर्वक हाताळा. आरोग्याची काळजी घ्या. आहारविहाराचे नियम पाळा. एकमेकांच्या मतांचा आदर कराल. भेटवस्तू देऊन प्रिय व्यक्तिला खूश कराल. जोडीदारावर तुमच्यामुळ कोणताही ताण येणार नाही याची काळजी घ्याल.
शुभरंग : पिस्ता
वृश्चिक – नवीन मार्ग शोधण्याची तयारी ठेवाल. दररोज सकाळी व्यायाम करायला प्राधान्य द्याल. आहार-विहाराचे नियम पाळा. आनंदी राहण्याचा प्रयत्न कराल. थोरामोठ्यांची मदत घ्याल. मेहनतीची कास सोडू नका. दररोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावा.
शुभरंग : मोती
धनु – आहाराचे पथ्यपाणी सांभाळा. आरोग्याची काळजी घ्या. प्रिय व्यक्ती तुमच्या मनासारखी वागेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. स्वत:ला प्रेरणा द्या. नकारात्मक विचार मनात आणू नका. बचतीकडे लक्ष द्या. आर्थिक गुंतवणूक फायद्याची ठरेल.
शुभरंग : लाल
मकर – घरातील कामांची योग्य वाटणी कराल. भावनेच्या आहारी जाऊ नका. राग आला तरी पटकन नातेसंबंध तोडू नका. एक गोष्ट मिळवण्यासाठी इतर तडजोडी कराव्या लागतील. सकारात्मक भावना ठेवा. घराच्या ग्रीलमध्ये गुलाबाचे झाड लावा.
शुभरंग : तांबडा
कुंभ – आत्मविश्वास वाढवा. अभ्यासाठी गोडी स्वत:मध्ये निर्माण कराल. वेळेचे भान नेहमीच ठेवा. नको ते विचार करून मनाची शक्ती वाया घालवू नका. आवडत्या वस्तूची खरेदी कराल.
शुभरंग : मोरपिसी
मीन – लेखन आणि कलागुणांना वाव मिळेल. नवीन संकल्पना राबवण्यासाठी वेळ काढाल. कुणाची मदत मिळेल या आशेवर राहू नका. विचारांवर ताबा ठेवा. गोड बोलून आपली कामे करून घेणे हिताचे ठरेल. मानापमानाच्या किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष कराल.
शुभरंग : पांढरा