April 1, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

स्वभावातील तापटपणा आणि हट्टीपणावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. खूप परिश्रमानंतर कमी यश प्राप्त झाल्याने नैराश्य येईल. संततीविषयक काळजी निर्माण होईल. पोटाच्या तक्रारीमुळे हैराण व्हाल. यात्रेत अडथळे येतील. सरकारी कामात मात्र यश मिळेल.

वृषभ

आज प्रत्येक काम दृढ़ आत्मविश्वास आणि खंबीर मनोबलासह कराल आणि त्यात यश मिळेल. वडिलांकडून व वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. कला आणि क्रीडा क्षेत्रांत कलाकारांना आपले कसब दाखविण्याची संधी मिळेल. संतती विषयक कामावर खर्च होईल असे श्रीगणेश सांगतात.

मिथुन

नवीन योजना अमलात आणण्यासाठी दिवस शुभ असल्याचा संकेत श्रीगणेश देतात. नोकरदारांना वरिष्ठ अधिकार्‍याकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा यथोचित मोबदला मिळेल. शेजारी- पाजारी, भावंडे तथा मित्रमंडळ यांच्या समवेत आनंदात वेळ घालवाल. भाग्योदयाचे प्रसंग येतील. जवळपासचे प्रवास घडतील.

कर्क

गैरसमज आणि नकारात्मक व्यवहार आपल्या मनात ग्लानी निर्माण करतील. तब्बेतीचा विशेषतः डोळ्यांचा त्रास होईल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. कामासंबंधी समाधानाची भावना निर्माण होईल. धन खर्च होईल. अनैतिक प्रवृत्तीकडे झुकणार्‍या मनाला काबूत ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. विद्यार्थ्यांना विद्यार्जनात निर्धारित सफलता मिळणार नाही.

सिंह

आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील आणि वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. स्वभावात संताप आणि वागण्यात तापटपणा राहील. त्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. डोकेदुखी आणि पोटाचे आजार बळावतील. दांपत्यजीवनात ताळमेळ राहील.

कन्या

आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक चिंतेत दिवस जाईल. स्वभावातील उतावळेपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबीय आणि मित्रांशी पटणार नाही. अचानक पैसा खर्च होईल. धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. कोर्टकचेरी आणि नोकरदारांपासून जपून राहा असे श्रीगणेश सांगतात.

तुळ

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस शुभफलदायी आणि लाभदायक जाईल. मित्रांशी भेट होईल आणि त्यांच्यासह फिरायला जाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पत्नी आणि मुलगा यांच्याकडून सुखा- समाधानाचा अनुभव येईल. नोकरी व्यवसायात उत्पन्न वाढेल. व्यापारात विकासाच्या संधी मिळतील. अविवाहितांना विवाहयोग येतील. दांपत्यजीवनात उत्तम वैवाहिक सुख मिळेल.

वृश्चिक

गृहस्थी जीवनाची सार्थकता आज आपल्या लक्षात येईल. असे श्रीगणेश सांगतात. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. व्यापार्‍याना व्यापारात चांगल्या संधी प्राप्त होतील. उत्पन्न वाढेल. नोकरी धंद्यात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. उच्च अधिकारी आणि वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल आणि त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळेल. संततीकडून समाधान मिळेल. मानप्रतिष्ठा वाढेल.

धनू

श्रीगणेश आज आपणाला तब्बेतीकडे लक्ष द्यायला सांगतात. कामात उत्साह आणि आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. नोकरी व्यवसायात त्रास होईल. जोखमीचे विचार, व्यवहार ठरविण्यापूर्वी पूर्ण विचार करण्याची आवश्यकता आहे. कामात फार कमी प्रमाणात यश मिळेल. उच्च अधिकारी आणि विरोधक यांच्याशी वादविवादात पडू नका असे श्रीगणेशांचे मत आहे.

मकर

नकारात्मक विचार प्रभावी होऊ न देण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. भागीदारां बरोबर संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. त्यावर खर्च करावा लागला. नवे संबंध प्रस्थापित करणे हितकर ठरणार नाही. संतापावर काबू ठेवल्यामुळे अनेक संकटांपासून वाचाल. खाण्यापिण्यावर विशष लक्ष द्या. अन्यथा तब्बेत बिघडेल. व्यवस्थापन कार्यात आपले नैपुण्य दाखवाल. अचानक धनलाभ होईल.

कुंभ

श्रीगणेश कृपेने आजचा दिवस प्रसन्नतेमध्ये जाईल. आपला आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे कामात यश मिळणे सहज बनेल. स्वभावातील मौजवृत्ती मनाला स्फूर्ती देईल. भिन्न लिंगीय व्यक्तींशी परिचय होईल व प्रणय, रोमान्स होण्याची शक्यता आहे. जवळचा प्रवास घडेल. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र आणि वाहनसुख मिळेल. भागीदारीत लाभ होण्याचा योग आहे.

मीन

मनाचा खंबीरपणा आणि आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. कुटुंबात सुख- शांती, आनंदाचे वातावरण राहील. राग आणि बोलण्याची उद्धट पद्धत यांवर संयम ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव येईल असे श्रीगणेश सांगतात.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click