August 16, 2022

आजचे राशिभविष्य!

आजचे राशिभविष्य!

मेष

कुटुंबातील व्यक्तींशी तीव्र मतभेद झाल्याने मन उद्विग्न राहील असे गणेशजींचे सांगणे आहे.छातीत दुखणे किंवा अन्य आजार यामुळे चिंताग्रस्त राहाल. निरर्थक आर्थिक खर्च होणार नाहीत याची काळजी घ्या, तरीही मन अस्वस्थ राहील. प्रवास- सहल न करण्याचा गणेशजी सल्ला देतात. शारीरिक व मानसिक आरोग्य ठीक राहील. बौद्धिक चर्चेपासून अलिप्त राहा.

वृषभ

आज आपणांस प्रत्येक कामात यश मिळेल. विरोधकावर मात कराल. सामाजिक क्षेत्रात मान-सम्मान मिळेल. परंतु दुपारनंतर संघर्षाचे वातावरण निर्माण होईल. आपली तरतरी आणि प्रेरणा निराशेत बदलेल. तरी मानभंगोपासून आपला बचाव होईल.

मिथुन

आज सकाळी आपले मन संतापी राहील असे गणेशजी सांगतात. शारीरिक व मानसिक ताणतणाव राहील. अनाठायी खर्च होईल. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळणार नाही. दुपारनंतर मात्र मित्र आणि स्नेही यांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. अर्थप्राप्ती चांगली होईल. भावंडांशी प्रेमभावना वाढेल. भाग्यशाली घटना घडतील. कामात यश मिळाल्याने उत्साह वाढेल.

कर्क

आज आपला दिवस आनंदात जाईल असे गणेशजी सांगतात. आज आपण अधिक संवेदनशील बनाल. आज शारीरिक व मानसिक सुख चांगले मिळेल. मित्र व स्नेही यांच्या भेटीमुळे सुख वाटेल. दुपारनंतर मात्र कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेत कटुता येईल. त्यामुळे मन दुःखी होण्याची शक्यता आहे. आपल्या मनात नकारात्मक बदल आणि निराशाजनक विचार येतील. रागावर नियंत्रण ठेवा.

सिंह

आज आपण उक्ती आणि कृतींवर पूर्ण संयम ठेवा असे गणेशजी सांगतात. संबंधितांचे मन दुखावण्याचे प्रसंग घडू शकतील. अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल. मानसिक चिंतांचा त्याग करा. तब्बेतीकडे लक्ष द्या. दुपारनंतर वातावरण अनुकूल राहील. नवीन कार्यारंभ कराल. स्नेही व्यक्तींशी प्रेमभेट होईल. कामे सरळ पार पडतील. आर्थिक लाभ होईल.

कन्या

आज आपणांस विविध माध्यमांतून लाभ होण्याची शक्यता आहे असे गणेशजी सांगतात. व्यवसाय क्षेत्रात फायदा होईल. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांसाठी केलेला खर्च फायदेशीर ठरेल. सहल प्रवासाचे योग. परंतु दुपारनंतर मनात अनिश्चितता राहील. संबन्धितान्शी मतभेद होतील, असे प्रसंग उद्भवतील. संतापाने कोणाशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आरोग्य नरम राहील. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल.

तुळ

गणेशजी सांगतात की आजचा दिवस आपणांस खूप शुभ आहे. धार्मिक कार्य आणि देवदर्शनाचा लाभ होईल. विविध क्षेत्रांत लाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कामास प्रोत्साहन मिळेल. बढतीचे योग आहेत. मनातील इच्छा फळद्रूप होतील. प्रिय व्यक्ति व मित्रांशी सुसंवाद होईल. रमणीय पर्यटनस्थळाला भेट द्याल. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राहील. विवाह सुखाची प्राप्ती होईल. युवक व युवती यान्ना लग्नयोग संभवतात.

वृश्चिक

श्रीगणेशजी सांगतात की आजचा दिवस आपणांस खूपच शुभ आहे. धार्मिक यात्रा आणि देवदर्शनाचा लाभ होईल. विविध स्तरांवर लाभ होण्याची शक्यता आहे. परदेश गमनाच्या संधी उपलब्ध होतील. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावर खुश होतील आणि आपणांस प्रोत्साहन देतील. स्थानवृद्धीची शक्यता. प्रियजन आणि मित्रांची भेट होईल आणि त्यांच्यासमवेत नयनरम्य पर्यटन स्थळाला भेट दयाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

धनू

कोणतेही नवीन कार्य आज सुरू न करण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. मनात निराशा व मरगळ निर्माण होईल. कुटुंबीयांशी वादविवाद करू नका. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक स्थिति सुधारेल. कौटुंबिक समस्या कमी होतील. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. धार्मिक स्थळांची यात्रा होईल. भाग्योदय होईल. ईश्वर स्मरण आणि आध्यात्मिकता मनःशांति देईल.

मकर

आजचा दिवस आप्तेष्टांसोबत खूप आनंदात घालवाल असे गणेशजी सांगतात. मनोरंजना मुळे मन आनंदाने भरून जाईल. बागीदारीत फायदा होईल. प्रवासाच्या मधुर स्मृती मनात येतील. व्यापारी क्षेत्रात लाभ होईल. दुपारनंतर मात्र वातावरण प्रतिकूल राहील. शारीरिक आणि मानसिकदृष्टया अस्वस्थ राहाल. नकारात्मक विचारांनी मन भरून जाईल. कुटुंबात मतभेद होतील.

कुंभ

आजचा दिवस पूर्णतः शुभ फलदायी असेल असे गणेशजी सांगतात. धंदा- व्यावसायिकांना दिवस अनुकूल राहील. शारीरिक आणि मानसिक दृष्टया आराम वाटेल. दिवसभर मनोरंजनामध्ये मग्न राहाल.

मीन

अस्वास्थ्य आणि उद्वेगाचा मनावर पगडा असेल. काही कारणास्तव अचानक खर्च करावा लागेल. तब्बेतीच्याही तक्रारी राहतील. दुपारनंतर मात्र घरात आनंद आणि शान्तता पसरेल. कार्यात यश आणि कीर्ती मिळेल. कुटुंबीयान्समवेत वेळ आनंदात जाईल. व्यवसाय- धंद्यात लाभ होईल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click