मेष
आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल असे श्रीगणेश सांगतात.त्यामुळे कोणाकडून आपल्या भावना दुखावल्या जाण्याचे प्रसंग येतील. आज आईच्या तब्बेतीची काळजी लागेल. घर,जमीन इ व्यवहार आज करू नका. मानसिक उदवेग दूर करण्यासाठी अध्यात्म, योग यांचा आधार घ्या. स्त्री आणि वाणी यांपासून जपा असे श्रीगणेश सांगतात. अभ्यासाच्या दृष्टीने मध्यम दिवस.
वृषभ
श्रीगणेश सांगतात की आज आपण जास्त संवेदनशील आणि भावूक विचार मनात आणाल आणि त्यामुळे मन द्रवेल. आपली आणि इतरांविषयीची काळजी दूर होईल. त्यामुळे मनाला दिलासा मिळेल. कल्पनाशक्ति आणि सृजनशीलतेने काम कराल. घरातील व्यक्ती आणि मित्रांसोबत स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. अकस्मित कारणाने प्रवास करावा लागेल. पैशाविषयी दक्ष राहाल. त्यामुळे आर्थिक नियोजन करू शकाल.
मिथुन
नातलग आणि मित्रांसोबत संवाद साधल्याने आज आनंदी राहाल. असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडाल. महत्त्वाच्या कामाची सुरुवात उशीरा होईल पण नंतर मात्र सहजगत्या ती पार पडतील. त्यामुळे मनःशांती अनुभवाल. नोकरी- धंदा यात वातावरण मनासारखे राहील. साथीदार सहकार्य करतील.
कर्क
श्रीगणेश सांगतात की आज आपल्या मनात प्रेम भावनेचे तरंग उमटतील. त्याच मूड मध्ये राहाल. मित्र, स्वकीय आणि संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. त्यांच्यासमवेत आपण आपला दिवस खुशीत घालवाल. प्रवास, मनपसंत भोजन आणि प्रिय व्यक्तींचा सहवास यामुळे उल्हासीत राहाल. पत्नीच्या सहवासात मन प्रसन्न राहील.
सिंह
कोर्ट कचेरीच्या प्रश्नात सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अनैतिक कृत्य घडणार नाही याची दक्षता घ्या. स्त्रियांच्या बाबतीत विशेष दक्ष राहा. उक्ती आणि कृती यात सुसंवाद राखा. विदेशातून वार्ता येतील. कायदेशीर गोष्टींचा निर्णय विचारपूर्वक घ्या.
कन्या
श्रीगणेश सांगतात की आपणांसाठी घर, कुटुंबीय, व्यापार अशी सर्व क्षेत्रे लाभ देण्यासाठी तयार आहेत. मित्रांसोबत आनंददायी प्रवास घडेल. दांपत्यजीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. धनप्राप्ती साठी शुभ काळ आहे. व्यापारातील पैसे मिळविण्यासाठी प्रवास करावा लागेल. अविवाहितांना जीवनसाथी शोध मोहीमेत यश मिळेल.
तुळ
श्रीगणेशांना आज आपणाला नोकरीत बढतीचे योग दिसतात. वरिष्ठांची आपणावर कृपादृष्टी राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरेल. मनात भावनात्मकता वाढेल. मातुल घराण्याकडून फायदा होईल. उत्तम विवाहसुख मिळेल. जमीन आणि मालमत्तेचे व्यवहार करू शकाल. व्यवसायात साफल्यपूर्ण दिवस राहील.
वृश्चिक
आजचा दिवस अनुकूलता आणि प्रतिकूलतेचा संमिश्र राहील असे श्रीगणेश सांगतात. लेखन- साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायात प्रतिकूल वातावरण. वरिष्ठ अधिकार्यांचा कल नकारात्मक राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद करू नका. संततीशी मतभेद होतील. प्रवासाची शक्यता आहे. पैसा खर्च होईल.
धनू
खाण्या पिण्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात. कामात यश मिळायला विलंब झाल्याने निराशा वाटेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. नवे काम हाती घेऊ नका. तब्बेत बिघडेल मन बेचैन राहील. बोलण्यावर संयम ठेवा. खर्च वाढेल.
मकर
पैशाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. व्यापार वाढीचे योग आहेत. त्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन अशा विविध मार्गांनी पैसा मिळून धनभांडारात वाढ होईल. प्रेमिकांसाठी प्रणय परिचयाचा दिवस आहे. विजातीय आकर्षण राहील. सुंदर भोजन, नवी वस्त्रे आणि वाहनसुख मिळेल.
कुंभ
सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळेल व प्रसिद्धी पण मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. माहेरहून अनेक शुभवार्ता येतील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत पण सहकारी चांगले सहकार्य करतील. शरीर आणि मन प्रसन्नता अनुभवेल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहील.
मीन
आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. अभ्यासात यश आणि प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्यक्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल. प्रेमीजनांना परस्परांचा सहवास लाभेल. आपल्या स्वभावात जास्त हळवेपणा राहील. स्त्री स्नेह्यांसाठी खर्च होईल.