मेष – अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचार केल्याने बरेच काही साध्य करता येईल. कामात नेहमीपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील.नातेवाईकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हाल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. आरोग्य चांगले राहिल.
शुभरंग : काळा
वृषभ – स्वत:साठी वेळ काढाल. चांगल्या कामांसाठी थोडासा धीर धरा. घरातील कामे वेळीच पूर्ण करावी लागतील. नातेवाईकांच्या शुभेच्छा मिळतील. अध्यात्मात रस घ्याल. घरातील अडगळ वेळीच घराबाहेर काढाल. मंदिरात जाऊन देवदर्शनाचा लाभ घ्या.
शुभरंग : गुलाबी
मिथुन – खर्चावर नियंत्रण ठेवा. खरेदीचा अट्टाहास टाळा. वादविवादापासून लांब राहा. वरिष्ठ कौतुक करतील. योगासन करण्याला महत्त्व द्याल. व्यवसायात नव्या संकल्पना राबवण्याचा प्रयत्न कराल. सामाजिक कामात महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. लाल रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : निळा
कर्क – अनुभवातून शिकवण मिळेल. नको त्या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करू नका. अचूक निर्णय घ्याल. जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. प्रकृतीची काळजी घ्या. घरात समारंभ साजरा होण्याची शक्यता आहे. मोत्याच्या दागिन्यांची खरेदी कराविशी वाटेल.
शुभरंग : पिवळा
सिंह – अनपेक्षित संधी चालून येण्याची शक्यता आहे. लोकांना दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण कराल. व्यवसायात यश मिळेल. आर्थिक प्रगती होण्याचा योग आहे. आरोग्य चांगले राहिल. सकाळच्या कोवळ्या उन्हात पंधरा मिनिटे बसा. सूर्योपासना करा. हाती घेतलेले काम तडीस न्याल.
शुभरंग: पोपटी
कन्या – घेतलेले निर्णय यशस्वी होतील. उत्साहात वाढ होईल. मोठी गुंतवणूक करण्याआधी योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन घ्या. लक्ष्मी प्रसन्न होईल. घराच्या परसात आवडीचे फुलझाड लावून त्याची निगा राखा. नियोजन केल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नका. घरातील वातावरण आनंदी असेल.
शुभरंग : हिरवा
तूळ – कोणाच्याही डावपेचांना बळी पडू नका. जबाबदारीने वागल्यास त्रास होणार नाही. कामातील उत्साह वाढेल. सामाजिक कार्यात झोकून देऊन काम कराल. मित्रमैत्रिणींशी अचानक भेट होण्याचा योग आहे. नियमित व्यायाम करण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : राखाडी
वृश्चिक – मनस्ताप होईल अशा गोष्टिंपासून लांब राहा. आरोग्याची काळजी घ्या. धीर धरून सर्व गोष्टी करणे आपल्यासाठी योग्य आहे. वादविवादाच्या प्रसंगापासून लांब राहा. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. आवडत्या व्यक्तिचा सहवास लाभेल. घराच्या सुशोभिकरणाचे काम हाती घ्याल.
शुभरंग : चंदेरी
धनु – मतभेद ताणू नका. सामोपचाराने वाद मिटवा. रुसवे-फुगवे बाजूला ठेवा. स्वत:च्या बोलण्यावर ताबा ठेवा. व्यवसायात नको त्या ठिकाणी धाडस करणे टाळा. आर्थिक ताण येणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आरोग्याच्या तक्रारींवर वेळीच औषधोपचार करा.
शुभरंग : खाकी
मकर – दिलेला शब्द पाळा. बेकायदेशीर गोष्टींना थारा देऊ नका. आर्थिक व्यवहार जपून करा. कोणाच्याही कामात हस्तक्षेप करू नका. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा करा. शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व द्या. करमणुकीचे बेत आखाल. घरच्यांचे आशीर्वाद लाभतील.
शुभरंग : पांढरा
कुंभ – घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. घरात आनंदी वातावरण असेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नव्या सौंदर्य उत्पादनांची खरेदी कराल. झोपताना चटईचा वापर करा. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कराल.
शुभरंग : सोनेरी
मीन – जनसंपर्क वाढवाल. घरगुती वातावरण उत्साही असेल. जिवलग मित्रांची भेट होईल. आर्थिक लाभ चांगले होतील. धार्मिक कर्यात मन रमवाल. आजवर अनुभवातून शिकलेल्या गोष्टींचा फायदा होईल. आपले व्यक्तिमत्त्व खुलवणाऱ्या गोष्टी घडतील.
शुभरंग : मोती