मेष – आरोग्य चांगले राहिल. प्रिय व्यक्तिसोबत सुट्टीचा आनंद घ्याल. दातांची काळजी घ्या. आजचे काम उद्यावर टाकू नका. कोणाच्याही वादविवादात पडू नका.मनाजोगती खरेदी करण्यासाठी आज वेळ मिळेल. जोडीदाराला त्याची आवडती भेटवस्तू द्याल.
शुभरंग : आकाशी
वृषभ – नकारात्मक विचार करू नका. प्रेरणादायी पुस्तक वाचाल. चपळाईने काम करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे कामात यश मिळेल. नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. गोड हसण्याने आजच्या दिवसाला सुरुवात कराल.
शुभरंग : निळा
मिथुन – अन्नदान करा. अतिजास्त प्रमाणात चहा, कॉफीचे सेवन करू नका. सकाळी सूर्यनमस्कार घाला. जोडीदार तुम्हाला खूश करण्याचा प्रयत्न करेल. स्वत:साठी वेळ काढाल. घरातील ज्येष्ठ व्यक्तिंसाठी वेळ काढाल. मनोराज्यात रमू नका.
शुभरंग : जांभळा
कर्क – इष्टदेवतेची उपासना करा. आरोग्य चांगले राहील. सायंकाळी बागेत फिरायला जाल. जोडीदारासोबत गप्पा मारण्यासाठी आज वेळ मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. घराच्या ग्रीलमध्ये औषधी वनस्पतींची लागवड करा. कलेतील कौशल्य वाढीस लागेल.
शुभरंग : मोरपिसी
सिंह दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. पैशाची गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. आज नको त्या कामांच्या मागे लागल्याने वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. लहान मुलांसाठी वेळ काढाल. चिनीमातीची फुलदाणीत आवडती सुगंधी फुले ठेवा. शुभरंग: शुभरंग : काळा
कन्या – सूर्योदयाच्या वेळी सूर्यस्नान करा. दुसऱ्यांवर टीका करू नका. आवडते मासिक वाचण्याकरिता वेळ काढाल. घरातील वातावरण आनंददायी असेल. अनावश्यक टीव्ही बघण्यात वेळ वाया घालवू नका. रोजच्या कामात व्यस्त राहाल.
शुभरंग : हिरवा
तूळ – घाईने निर्णय घेऊ नका. जोडीदाराला खूश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. आजचा दिवस आनंदाचा आहे. स्वयंसेवी संस्थांच्या कामकाजात भाग घ्याल. आवडत्या व्यक्तिची अनपेक्षित भेट होईल. कुटुंबासोबत बसून महत्त्वाच्या ठिकाणी गाठीभेटी घ्या. रोज सकाळी देवळात देव दर्शनाला जा.
शुभरंग : राखाडी
वृश्चिक – आराध्य देवतेची पूजा करा. पैसे खर्च करताना विचार करा. आजचा दिवस कंटाळवाणा जाण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जाणवण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मनमोकळं बोलायला वेळ मिळेल. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करायला वेळ द्याल. अत्तराचा वापर करा.
शुभरंग : राखाडी
धनु – आजचा दिवस व्यस्त राहाल. सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावा. इतरांवर प्रभाव पडेल. प्रवासाची संधी शोधाल. नातेवाईक अनपेक्षित घरी येण्याची शक्यता आहे. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. समाजात मान मिळेल.
शुभरंग : चंदेरी
मकर – सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या. कुटुंबियांना समजून घ्याल. जवळच्या नातेवाईकांसोबत गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. सायंकाळी मिळालेला रिकामा वेळ टीव्ही आणि सिनेमा पाहण्यात घालवाल. कार्यालयातून लवकर घरी यायला मिळेल. घरच्यासोबत सुसंवाद साधण्यासाठी बऱ्याच दिवसांनी वेळ मिळेल.
शुभरंग : पांढरा
कुंभ – दुर्गा कवच वाचा. आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. खिशात हिरव्या रंगाचा रुमाल ठेवा. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. ठरवलेले प्लॅन बारगळण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेट होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस चांगला जाईल.
शुभरंग : सोनेरी
मीन – आरोग्याची काळजी घ्या. रागीट स्वभावाला आवर घाला. सौंदर्याची काळजी घेण्यासाठी वेळ काढाल. आयुष्याचा सुखद अनुभव घ्याल. नवीन लोकांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. पालकांना मनातली इच्छा सांगण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मनाजोगी खरेदी कराल.
शुभरंग : चॉकलेटी