मेष : विचारांमध्ये सकारात्मकता आणावी लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर ते पुढे ढकलणे योग्य नाही. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे, त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला राहील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकतो.
वृषभ : तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकाल. सध्या ज्या संस्थेत काम करत असाल, तिथे तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष आनंद घेऊन येईल. वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील. कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहतील. मात्र, अचानक काही आजार डोकं वर काढतील आणि त्यावर उपचार करावे लागतील.
मिथुन : आज आपली कार्यक्षमता वाढवण्याचा विचार करावा. शेअर बाजारात सक्रिय असणाऱ्या लोकांनी आज अधिक सावध राहण्याची गरज आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा. विद्यार्थ्यांना त्यांचे लक्ष अभ्यासाकडे वळवावे लागेल, तरच ते अपेक्षित यश मिळवू शकतील. वैवाहिक नात्यात गोडवा वाढेल. आज खर्च वाढण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर चांगली बातमी मिळेल.
कर्क : वायफळ खर्च करणे टाळावे लागेल. अन्यथा तुम्ही तुमचा जमा केलेला पैसाही खर्च कराल. भविष्याच्या दृष्टीने हे घातक ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ मिळतील. रागावर नियंत्रण ठेवा. आज रागाच्या भरात एखादा चुकीचा निर्णय घेऊ नका. विचार केलेली बरीचशी कामे हळूहळू पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल.
सिंह : ऑफिसमध्ये आज तुमच्या कामाचे कौतुक होईल. पडलेले अनेक प्रश्न सुटतील. आरोग्य चांगले राहील. जे काही काम सुरू कराल, ते वेळेवर नक्की पूर्ण होईल. आज करिअरशी संबंधित नवीन संधी मिळू शकते. मात्र, तब्येतीची काळजी घेऊनच काम करा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. अविवाहित लोकांना लग्नासाठी चांगली स्थळे सांगून येतील.
कन्या : आज एखादा जवळचा मित्र भेटेल, ज्याच्याशी बोलून तुम्हाला आनंद होईल. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणार्यांना भरपूर फायदा होईल. मात्र, संभाषणात सौम्यता जपावी. आरोग्याच्या दृष्टीने खाण्याबाबत निष्काळजीपणा योग्य नाही.
तूळ : दीर्घकाळ प्रलंबित कामे आज सहजतेने पूर्ण करू शकाल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. अनावश्यक वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थी कोणत्याही नवीन स्पर्धेत भाग घेऊ शकतात. कामाच्या ठिकाणी मिळणार्या लाभामुळे नोकरदार वर्ग आनंदी राहील. जंक फूडचे सेवन अजिबात करू नये, ते आरोग्यासाठी चांगले ठरणार नाही.
वृश्चिक : आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा कठीण असणार आहे. कामाच्या ठिकाणी सर्वांशी संबंध चांगले राहतील. शांतपणे आणि पूर्ण मन लावून काम केले पाहिजे. तुमची शक्ती चांगल्या कामात खर्च कराल. जीवनसाथीच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण होतील. घरामध्ये मंगल कार्याचे आयोजन करण्याचा निर्णय घ्याल. नोकरीशी संबंधित लोकांना चांगली संधी मिळू शकते.
धनु : आज एखादा जुना मित्र तुम्हाला भेटेल, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. रखडलेल्या कामात मित्राची मदत मिळेल, त्यामुळे कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मात्र, आरोग्याची काळजी घ्या. कोणताही नकार आला, तर ते अपयश मानून निराश होऊ नका. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. व्यवसाय वाढवण्यासाठी काही नवीन मार्ग शोधावे लागतील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा.
मकर : आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी नीट विचार करा. जोडीदारासोबत सुरू असलेला वाद आज संपुष्टात येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये काही सकारात्मक परिणाम मिळतील. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही नवीन योजना तयार कराल. शत्रू तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे सावध रहा. पैसे गुंतवताना काळजीपूर्वक विचार करा.
कुंभ : कौटुंबिक वातावरण आज अधिक आनंदी असणार आहे, कुटुंबासोबत त्याचा आनंद घ्या. व्यवसायातही शत्रू तुमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सावध रहा. कौटुंबिक समस्यांचे निराकरण होईल. जोडीदाराला यश मिळेल. नवीन लोकांना भेटणे तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. राजकारणाशी संबंधित लोकांचा मन सनम वाढेल.
मीन : आज तुम्ही एखाद्या बाबतीत मोठा निर्णय घ्याल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. व्यावसायिकांना आज काही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नात्यात जिव्हाळा वाढेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबात कोणत्याही प्रकारचा कलह टाळावा.