December 10, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष-
ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. मनात उत्साहवर्धक विचार राहतील. एखाद्या मोठ्या व्यवहारात लाभ होईल. जुनी येणी वसूल होतील. शुभवर्तमान कळेल. तुमचे पारडे जड राहील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. अनुकूल घटना घडतील.

वृषभ-
नोकरीत प्रगतीला वाव राहील. एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. पद-प्रतिष्ठा प्राप्त होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जीवनाचा दर्जा उंचावण्याचा दृष्टीने चांगला काळ आहे.

मिथुन-
यशदायक काळ आहे. तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात लाभ होईल. प्रवास घडून येईल. नवीन ओळखी होतील. त्यातून फायदा होईल. अडचणी दूर होतील. नोकरीत प्रगती होईल. एखादी इच्छा पूर्ण होईल. नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील.

कर्क-
नोकरीत मनासारखे निर्णय होतील. काहींना मोठे पद मिळू शकते. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईळ. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. अकल्पितपणे आर्थिक लाभ होईल. कायद्याची बंधने पाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

सिंह-
विवाहेच्छूंचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली होतील. प्रेमात असाल तर घरातील वडीलधाऱ्या मंडळींना सांगण्यास हरकत नाही. हाती घेतलेले कार्य सिद्धीस जाईळ. व्यवसायात बरकत राहील. नोकरीत अनुकूल स्थिती राहील.

कन्या-
महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. त्या दृष्टीने सावधपणे पावले उचण्याची गरज आहे. काम झालेच पाहिज असा अट्टाहास असता कामा नये. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. एखादी व्यक्ती तुम्हाला फसवू शकते.

तूळ-
समाजसेवा करण्यात आघाडीवर राहाल. लोक तुमची प्रशंसा करतील. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. सहकारी मदत करतील. शुभ समाचार कानावर पडतील. हाती घ्याल ते तडीस न्याल अशी परिस्थिती राहील.

वृश्चिक-
नोकरीत बढतीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. थोड्या फार प्रयत्नाने काम होईल. लोकांची साथ राहील. त्यामुळे काम करण्यास हुरूप राहील. घरी पाहुणे येतील. इष्ट मित्र भेटतील. काहींना भेटवस्तू मिळतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

धनू-
धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. व्यवसायात विक्री चांगली होईल. बरेच दिवस पडून राहिलेला माल विकला जाऊ शकतो. नोकरीत प्रगतीला पोषक वातावरण राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवास फायदेशीर ठरतील.

मकर-
होती घेतलेले काम पूर्ण कराल. अनेकांचे सहकार्य़ मिळेल. कामाचा ताण जाणवणार नाही. सोप्या रीतीने कामे पार पडतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. जमीनजुमल्याची कामे मार्गी लागतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. नोकरीत प्रगती होईल.

कुंभ-
नोकरीत उच्च पद, अधिकार मिळतील. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. जोडीदार छान साथ देईल. धनलक्ष्मीची कृपा राहील. लोकांचे सहकार्य मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. महत्वाचे काम पूर्ण होईल.

मीन-
वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. घरात बसणे होणार नाही. सतत काही ना काही कामे मागे लागलेली राहतील. व्यवहार सावधपणे करा. कामाचे नियोजन नीट करा. एखाद्या योजनेत फसवणूक होण्याची शक्यता आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click