October 5, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष : आज तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिवस काहीसा कठीण असणार आहे. मात्र, एखादी चांगली बातमी कानावर येऊ शकते. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मात्र, अतिरिक्त काम करण्याची तयारी ठेवा. स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. गुंतवणूक करताना विचार करा. एखाद्या वरकरणी चांगल्या वाटणाऱ्या ठिकाणी पैसे गुंतवू नका.

वृषभ : आज दिवसभर उत्साही राहाल. जे काम हातात घ्याल, त्यात नक्की यश मिळेल. प्रवास करायचा असल्यास तो काही काळ पुढे ढकला. मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न करा. मित्रांची भेट होईल आणि त्यांचे सहकार्य देखील होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक स्थितीतही काहीसा सुधार होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.

मिथुन : आजच्या दिवशी कोणतेही काम नाही म्हणून टाळू नका. सततच्या वाढणाऱ्या खर्चावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न कराल. कोणतीही मौल्यवान गोष्ट खरेदी करताना काळजी घ्यावी लागेल. बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. काही जुने व जवळचे मित्र भेटण्याचे योग आहेत. आर्थिक समस्यांचे निराकारण होईल.

कर्क : आज शत्रूला सहज पराजित कराल. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. या काळात घरगुती जबाबदाऱ्या विसरू नका, अन्यथा कुटुंबाचा रोष ओढवून घ्याल. प्रिय व्यक्तीशी बोलताना संयम बाळगा. एखादे काम करण्यास मोठ्यांनी मनाई केली असेल, तर त्यापासून दूरच राहा. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळणार आहेत. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

सिंह : आज आरोग्याची काळजी घेण्याचा दिवस आहे. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांसोबत वाद संभवतात. प्रवास करावा लागू शकतो. हुशारीचा वापर कराल, तर नक्की यशस्वी व्हाल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला कामी येईल. कुटुंबाची साथ मिळेल. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.

कन्या : आज तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्यासंबंधित कुरबुरी वाढू शकतात. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आपापसांतील वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. जुन्या गोष्टी विसरून, पुढे जाण्याचा प्रयत्न करा. अति रागराग करणे टाळा. मनात निराशेची भावना राहील. मात्र, खचून जाऊन नका, जिद्दीने पुढे जात राहा. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा.

तूळ : आज दिवसभर मनःशांतीच्या शोधात असाल. अचानक खर्च वाढू शकतात. कामच्या ठिकाणी अधिक सक्रिय राहावे लागेल. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. कुणालाही उधारी देणे टाळा. प्रिय व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी कोणताही करार करण्यापूर्वी वडिलधाऱ्यांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल. काम यश मिळाल्याने आनंदी राहाल.

वृश्चिक : समाजकार्यात रस दाखवाल. सामजिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या लोकांसाठी दिवस आनंदमय असणार आहे. मनातील काही आशा पल्लवित होतील. आर्थिक स्थिती देखील सुधार होईल. एखादे नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. विवाहयोग्य लोकांना चांगले स्थळ सांगून येईल.

धनु : आज तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मनःशांती मिळेल. पैशांचा व्यवहार करताना सावध राहा, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. आर्थिक तंगीमुळे एखादे काम अर्धवट राहू शकते. मात्र, कुटुंबाकडून मदतीचा हात मिळेल. नोकरपेशा लोकांवर अतिरिक्त जबाबदारी पडू शकते. प्रवासाचे योग देखील आहेत. आरोग्याची काळजी घ्या.

मकर : आज तुमचे मन प्रसन्न राहील. स्वतःकडे लक्ष देण्याचा दिवस आहे. एखादी खास भेटवस्तू देखील मिळू शकते. आर्थिक लाभ झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. बहिण भावांचे कामात सहकार्य मिळेल. एखाद्या समस्येवर तोडगा शोधताना कुटुंबातील सदस्यांची मदत घ्या. व्यवसायाच्या विस्तारासाठी पैसे मिळू शकतात. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.

कुंभ : अनावश्यक वाद घालणे टाळा. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी मदतीची गरज भासल्यास, ती घ्या. प्रवासाची संधी चालून आल्यास ती स्वीकारा. यामुळे लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभ झाल्याने अनेक चिंता दूर होतील. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.

मीन : मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या निमित्ताने धावपळ होईल. त्यामुळे थकवा जाणवेल आणि डोकेदुखी, अंगदुखी, ताप इत्यादी समस्याही उद्भवू शकतात. आज तुम्हाला रखडलेले पैसे परत मिळू शकतात. मालमत्तेत गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तणाव टाळण्याचा प्रयत्न करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कोणतेही काम करताना ते काळजीपूर्वक करा.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click