मेष-तुम्हाला अस्वस्थता जाणवेल. तुमचं खराब आरोग्य तुमच्या अस्वस्थतेचे कारण असेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात गुंतणार नाही. नोकरदार वर्गाला कार्यालयात येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्रास होईल.
तरीही तुम्ही हार न मानता काम कराल. तुमची चिकाटी दाखवून द्या. खर्चाचे नियोजन करा. अवांतर खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
वृषभ-कार्यक्षेत्रात लाभदायक सिद्ध होईल. तुम्ही सर्वांसोबत चांगल्याशी वागाल. व्यवसायात नफा होईल. लोकांकडून सन्मान मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल, पदोन्नती देखील होऊ शकते. कामावर नीट लक्ष द्या तुम्ही प्रगतीपथावर आहात. सप्ताहाच्या पूर्वार्धात महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवा. भागीदार किंवा असोसिएशनद्वारे व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थितीही सुधारेल.
मिथुन- आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असेल. आज तुम्ही तुमच्या जुन्या मित्राशी संवाद होईल. मन प्रसन्न राहील. शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला राहील, भविष्य चांगले करण्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून आवश्यक सल्ला घेऊ शकता. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व शक्य सहाय्य उपलब्ध असेल. घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील.
कर्क- आरोग्य बिघडू शकतं, ज्यामुळे संपूर्ण दिवस अस्वस्थतेतच जाईल. कामात एखाद्याचा पाठिंबा लाभेल त्यामुळे उत्साहीपणा जाणवेल. कौटुंबिक जीवनात आनंद नांदेल. उत्पन्नात वाढ शक्य आहे. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. लोकांनी या दिवशी जास्त मसालेदार अन्न खाणे टाळावे, अन्यथा तुम्हाला पोटाच्या समस्या होऊ शकतात. इतरांना मदत करण्यासाठी पुढे सरसावाल. व्यापारी वर्गासाठी गोष्टी थोड्या सामान्य राहतील. प्रवासात दगदग होईल.
सिंह- भाग्य पूर्णपणे तुमच्यासोबत नसेल. पण न्यायालयासंबंधीत बाबीतून तुम्हाला दिलासा मिळेल. तुम्ही भविष्यात पूर्ण यश मिळवू शकाल. जर कोणतेही कायदेशीर प्रकरण प्रलंबित असेल तर ते न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश दर्शवते. कामाच्या ठिकाणी मेहनत, समर्पण आणि आसक्ती स्पष्टपणे दिसेल. ज्यामुळे कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल. ओळखीतून कामे होतील. चांगल्या संधी चालून येतील. तुमच्या शब्दाला मान राहील.
कन्या- तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगलं यश मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकतात. तुमचा पार्टनर तुम्हाला संध्याकाळी सरप्राईज देऊ शकतो. दुसरीकडे, जे भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांना या दिवशी जवळच्या नातेवाईकाकडून चांगला सौदा मिळू शकतो. तुमचे पैसे योग्य कामात खर्च होतील. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील, परंतु त्यांच्या मनात भीती राहील. शिक्षण घेण्यासाठी गुरुवार चांगला आहे. मेहनतीनुसार तुम्हाला यश मिळेल.
तूळ- दिवसाची सुरुवात आनंदाने होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. नोकरीत चांगले आर्थिक लाभ होतील. पदोन्नतीची चिन्हं आहेत. तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात. या दिवशी तुमचे वरिष्ठ तुम्हाला मोठी जबाबदारी देऊ शकतात. या राशीचे काही लोक त्यांच्या कारकीर्दीत प्रगती मिळवण्यासाठी नवीन अभ्यासक्रमात सामील होण्याचा विचार करू शकतात. व्यापाऱ्यांना फायद्याची परिस्थिती आहे. दिवसभर चपळतेने प्रत्येक कामं अगदी सहज पूर्ण कराल. विरोधक कुरघोड्या करेल. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्यावे.
वृश्चिक- तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायासाठी दिवस चांगला राहील. दिवसाची सुरुवात चांगली होईल. भावंडांशी वाद झाल्याने कौटुंबिक जीवनात अस्थिरताही येऊ शकते. प्रेमसंबंध तसेच राहतील. मेहनतीने आपण वरिष्ठांना संतुष्ट करू शकाल. तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळू शकतात. भावंड आणि मित्रांसोबत जास्त वेळ घालवाल. पदोन्नतीच्या विचार करत असाल तर बॉसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
धनु- संपूर्ण दिवस उत्साहाने भरलेला असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. कामात तुम्हाला चांगले पैसे मिळतील. या राशीचे लोक धार्मिक आणि आध्यात्मिक बाबींमध्ये रस घेऊ शकतात. असे केल्याने तुमच्या मनातील अनेक समस्या आज दूर होऊ शकतात. तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. दिवस चांगला जाईल. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुमचे महत्त्व वाढेल. अनुकूल ग्रहमानाचा फायदा घेण्यासाठी योजना आखा.
मकर- कामाच्या ठिकाणी प्रत्येकाशी चांगले वागाल. सहकाऱ्यांची वेळोवेळी साथ मिळेल. आत्मविश्वास आणि धैर्य दुणावलेला असेल. राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक सभांमध्ये भाग घेतील. तुम्हाला गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. चांगले पैसे कमवू शकाल. कौटुंबिक सुख प्राप्त होईल. पाल्यांकडे लक्ष द्या. नोकरीत वेतनवाढ मिळेल.
कुंभ – कुटुंबाची काळजी घ्याल. त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील सदस्यांसाठी व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढाल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. या राशीच्या लोकांना आज डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. मित्र तुम्हाला आर्थिक मदत करण्यास मदत करतील.
मीन- आज नशीब खूप साथ देणार आहे. नोकरीत काम धंद्यात लक्ष लागेल. कामाच्या ठिकाणी नफ्याची स्थिती राहील. कुटुंबात एक प्रकारचा शुभ कार्यक्रम होईल, तुम्ही त्यात सहभागी व्हाल. संपूर्ण दिवस मजेत जाईल. आर्थिक मदतही मिळू शकते. तरीही अती खर्च करणं टाळा. मोठ्या उलाढाली फायदेशीर ठरतील. जुनी येणी वसूल होतील. त्यासाठी थोडे प्रयत्न करा. अचानक धनलाभ होईल. आपले अंदाज बरोबर ठरतील.