August 16, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष –  आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक आहे. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र व कुटुंबीयांसह दिवस आनंदात घालवाल. जास्त लोकांच्या संपर्कात याल. व्यापारी वर्ग व्यापारवाढ व नियोजन करू शकतील. आपल्या हातून लोकहिताचे एखादे काम होईल.

वृषभ –  आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्या विचारांचा मोठेपणा व वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करेल. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वाद – विवाद ह्यात यशस्वी व्हाल. कष्टाचे पूर्ण चीज झाले नाही तरी आपण पुढेच जात राहाल. पचनक्रियेची समस्या उदभवुन प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.

मिथुन – आज आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मनःस्थिती होईल. आई व स्त्रीयांच्या बाबतीत संवेदनशील व्हाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. निद्रानाश झाल्याने प्रकृती बिघडेल. शक्यतो प्रवास टाळा. पाणी व द्रव पदार्थ घातक ठरतील. जमीन, मिळकत यावर आज चर्चा करू नका.

कर्क – आज आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र व नातलग भेटतील. प्रिय व्यक्ती कडून आनंद मिळेल. आप्तेष्टांसह पर्यटनाचे बेत आखाल. मनात प्रसन्नता राहील. आज केलेल्या कार्यात यश मिळवू शकाल. नोकरी- व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

सिंह – आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्‍या लोकांचे निरोप येतील व व्यवहारातून लाभ होतील. आज आपल्या मधुर वाणीने इतरांची मने जिंकाल. कार्यात यश मिळवू शकाल.

कन्या –  आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. आनंदाची प्राप्ती, जीवन साथीचा सहवास व सहल – प्रवास ह्यामुळे आपला दिवस आनंदात जाईल.

तूळ – आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. व्यावसायिक व्यक्तींशी मतभेद होतील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. वाद टाळावेत. कोर्ट – कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. नातलगांचे गैरसमज होतील.

वृश्चिक –  आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज नोकरी, व्यापार व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रां बरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहेच्छुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नी कडून लाभ होईल. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल.

धनू – आज आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यापार विषयक योजना आखाल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. मान – सन्मान होतील. वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होतील.

मकर – आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल. त्यासाठी नियोजन कराल. सरकारी कामात प्रतिकूलता जाणवेल. शरीरास थकवा जाणवेल व मनःस्थिती पण ठीक राहणार नाही.

कुंभ – आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अनेक विध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबात कोणाचा तरी विवाह ठरेल. खर्च वाढल्यामुळे हात आखडता घ्यावा लागेल. मन शांत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

मीन – आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणातील लेखक किंवा कलाकारास कला व्यक्त करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. नाटक, चित्रपट, मनोरंजनाच्या ठिकाणांना भेट देऊन त्यांच्याशी जवळिक निर्माण कराल. यश व प्रसिद्धी वाढेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click