May 27, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष (Aries) :आततायीपणे वागून चालणार नाही. कामातून समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल.जुन्या अडचणी दूर होतील. स्वत:ची काळजी घ्या. नवे कपडे खरेदी कराल. तुमच्या सक्रियतेचा स्तर वाढेल. अडकलेलू कामं पूर्ण होतील. अनेक कल्पना सुचतील. खर्चांवर लक्ष ठेवा. दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करावा. हातातील कलागुण विकसित करावेत. न चतुराईचा आजचा दिवस आहे.

वृषभ (Taurus) :स्वछंदीपणे दिवस घालवाल. आपल्या आजच्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेऊन खरेदी कराल. घरातील गोष्टींसाठी वेळ द्यावा. समोरील प्रत्येक गोष्टीत रमून जाल. आजच्या दिवसाची सुरूवात चांगली राहील. आई-वडिलांचं प्रेम मिळेल. मुलांकडून सुख मिळेल. धनलाभ होणार.

मिथुन (Gemini) :रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. छंद जोपासायला वेळ काढाल. आवडत्या साहित्यात रमून जाल. कौटुंबिक सौख्याला अधिक प्राधान्य द्याल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. काम काज उत्तम सुरू राहतील. धनलाभ होईल मात्र अचानक खर्च देखील वाढतील.

कर्क (Cancer) :घरगुती जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. जवळचा प्रवास सुखकर होईल. काही खर्च अनाठायी होऊ शकतात. कामात भावंडे सहकार्य करतील. केलेल्या कष्टाचे समाधान मिळेल. आजचा दिवस खूप तणावाचा असेल. आज तुमच्या स्वभावात गंभीरपणा आणि एकाग्रता याची झलक दिसेल.

सिंह (Leo) :कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ जाईल. एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी अडून राहू नका. वयस्कर व्यक्तींचा मान राखाल. पैशाचा अपव्यय टाळावा. खोट्या गोष्टींना भुलू नका. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आज कोणतंही कार्य केलंत तरी तुम्हाला मदत मिळेल. पण मेहनत आणि अथक प्रयत्न आज करावे लागतील.

कन्या (Virgo) :दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत करावा. आवडत्या गोष्टीत अधिक रमून जाल. कमीपणा घ्यायला घाबरू नका. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. नवीन मित्र जोडले जातील. विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता आणि योग्यतेच्या आधारावर आज यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला दिवस घालवाल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल.

तूळ (Libra) :विचारांच्या गर्दीत भरकटू नका. कामाची योग्य दिशा ठरवा. कल्पनेत रमून जाऊ नका. कृतीला अधिक महत्त्व द्यावे. बोलतांना तारतम्य बाळगा. कामात यश मिळेल. मूड चांगला असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

वृश्चिक (Scorpio) :चांगला व्यावसायिक लाभ होईल. आपली आजची आर्थिक गरज पूर्ण होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल. व्यावसायिक दर्जा सुधारेल. दिवसाची सुरूवात खूपच चांगली होईल. कामात धनलाभ होईल. वैवाहिक जीवन चांगल असेल. जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील.

धनू (Sagittarius) :नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कर्तुत्वाला वाव देता येईल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यापारी वर्गाला नवीन धोरण आखता येईल. सन्मानाने भारावून जाल. आजच्या दिवसाची सुरूवात चांगल्या गोष्टीने होऊ शकते. कामात धनलाभ होईल. धनाचा संचय देखील करू शकता. मंगळवारचा संपूर्ण दिवस उत्सवाचा असेल.

मकर (Capricorn) :तरुणांचे नवीन विचार जाणून घ्या. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. दैनंदिन कामात थोडा बदल करून पाहावा. सबुरीच्या मार्गाने समोरील प्रश्न हाताळा. आईचे उत्तम सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या करिअरमध्ये यश प्राप्त होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. आत्मविश्वासाने भरलेला असेल आजचा दिवस.

कुंभ (Aquarius) :जोडीदाराची प्राप्ती वाढेल. पण त्याबरोबरच एकमेकांना समजून घ्यावे लागेल. वैचारिक मतभेदाला बाजूला ठेवावे. काम आणि वेळ यांचा योग्य मेळ घालावा. अचानक धनलाभाची शक्यता. कार्यात सफलता प्राप्त होईल. नोकरीदार वर्गाकरता आजचा दिवस महत्वाचा. पूर्वी उच्च पदासाठी अर्ज केला असल्यास त्यांना मोठ्या कंपनीतून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते.

मीन (Pisces) :अति आवश्यक असेल तरच बाहेर पडावे. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मतभेद संभवतात. संपर्कातील लोकांशी घनिष्ठता वाढेल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. कामात आजचा दिवस असेल. साहस आणि आत्मविश्वास हे महत्वाचं ठरणार आहे. जोडीदार आणि कुटुंबाकडून तुम्हाला चांगली साथ मिळेल. धनलाभ होणार.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click