मेष- आज तुम्हाला तुमचं महत्त्वं कळेल. दैनंदिन कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमचे प्रत्येक कार्य चपळतेने सहजपणे पूर्ण कराल.
विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत कोणाच्या मदतीमुळे नवीन काही शिकण्याची संधी मिळेल. प्रत्येक गोष्टीला स्वत:च्या स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करा. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना एखादं मोठं पद मिळेल.
वृषभ- अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळतील. तुम्ही तुमच्या वडिलांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. तुमचा दिवस चांगल्या बातमीने सुरू होणार आहे. मित्रांच्या मदतीने अडचणीतून बाहेर येण्याची संधी आहे. कोणताही वाद असो, तो लवकरात लवकर मिटवण्याचा प्रयत्न कराल.
मिथुन- आर्थिक परिस्थिती सुधारेल. आनंददायी गोष्टींवर लक्ष द्या. महत्त्वाकांक्षा वाढेल. तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित असतील. कामाच्या ठिकाणी तणावाची परिस्थिती असेल.
कर्क- हाताशी जास्तीचा वेळ ठेवा. आज कामं थोडी जास्त वेळासाठी चालतील. परिस्थिती तुमच्या पक्षात आहे. तुमचं मत स्पष्टपणे इतरांसमोर मांडा. फाजील आश्वासनांना बळी पडू नका. करिअरविषयी चिंता जाणवेल. मित्र आणि नातेवाईकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. अनोळख्या महिलेचा कॉल आल्यास तिला आपली गुप्त माहिती देऊ नये.
सिंह- जुन्या अडचणी दूर होतील. स्वत:ची काळजी घ्या. नवे कपडे खरेदी कराल. नवीन मैत्री तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्हाला शुभेच्छा मिळतील. तुमच्या सक्रियतेचा स्तर वाढेल. अडकलेलू कामं पूर्ण होतील. अनेक कल्पना सुचतील. खर्चांवर लक्ष ठेवा. दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करावा.
कन्या- भावनांमध्ये चढ- उतार जाणवेल. कोणत्याही गोष्टीची चिंता करु नका. एखादी शुभवार्ता मिळेल. तुमचा दिवस अधिक चांगल्या प्रकारे सुरू होणार आहे. तुम्ही तुमच्या हातात जे काही काम कराल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. असे काही बेत आखाल ज्याचा येत्या दिवसांमध्ये फायदा होणार आहे. प्रयत्न केल्यास अडकलेले पैसे मिळू शकतात.
तूळ- कोणा एका व्यक्तीसोबतचं नातं सुधारेल. आत्मविश्वासाचा फायदा होईल. सवयींवर लक्ष ठेवा. दिवस सर्वसामान्य असेल. इतरांबरोबर मिळून केलेल्या कामातही चांगले लाभ होतील. नेहमी आपला सकारात्मक विचार ठेवा. जुन्या गुंतवणूकीचा तुम्हाला फायदा होईल. आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करावा.
वृश्चिक- एखादं खास काम कुटुंबाच्याच मदतीने पूर्ण कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमची बुद्धिमत्ता आणि हुशारी दाखवून तुमची कामे सहज पूर्ण कराल. बोलण्यात गोडवा असेल, ज्यामुळे तुमचे मित्र आणि नातेवाईकांशी संबंधांमध्ये गोडवा येईल. नोकरीतील ताण दूर होईल. पूर्ण झालेल्या कामांचा फायदा होण्यास सुरुवात होईल. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळतेच असे नाही.
धनु- कमीत कमी वेळात जास्त काम आटोपण्याचा प्रयत्न कराल. एखादी शुभवार्ता कळेल. आज शत्रूंना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. नशीबाची आज साथ मिळेल. व्यवसायात फायदा होईल. जमीन आणि देवाणघेवाणीच्या व्यवहारांत नशीबाची साथ असेल.
मकर- आजच्या दिवसाचा आनंद घ्या. चांगल्या गोष्टींसाठी वेळ द्या. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज नशीबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगला वेळ घालवाल. घरी पाहुण्यांच्या येण्याने आनंदाच वातावरण असणार आहे. एखाद्या योजनेचा फायदा होईल. आज घेतलेल्या निर्णयांचे दूरगामी परिणाम दिसतील.
कुंभ- सावधानी बाळगून खर्च करा. तुम्ही फार खर्च करता तो जपून करा. गरजेच्या वस्तूंवर खर्च करा. तुम्हाला कामात चांगले यश मिळणार आहे. तुमची मेहनत आणि नशीब यांचा चांगला मेळ होईल आणि याचा फायदाच होणार आहे. पैशांची चणचण भासणार नाही. अचानक धनलाभ होऊ शकतो. अडून असलेली कामे मार्गी लागतील.
मीन – पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. दिवस चांगला आहे. भावनांमध्ये चढ- उतार जाणवेल. अनावश्यक आज कोणाशी वाद होईल. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही तंदुरुस्त असाल. शरीरात चपळता येईल. नोकरी असो किंवा व्यवसाय, प्रत्येकाला चांगले यश मिळेल. कोणत्याही गोष्टीची चिंता करु नका. एखादी शुभवार्ता मिळेल. असे काही बेत आखाल ज्याचा येत्या दिवसांमध्ये फायदा होणार आहे.