March 22, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात.जोडीदारासह एकत्र वेळ घालवाल आणि प्रेमसुखाचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ तसेच प्रवासाची शक्यता. उग्र विचार आणि अधिकार गाजविण्याची भावना वाढेल. आपल्या कामाचे कौतुक होईल. शक्यतो वादविवाद टाळा. वाहनसुख चांगले मिळेल.

वृषभ

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभफलदायी जाईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. अर्थ विषयक लाभाची शक्यता. माहेर कडून चांगल्या वार्ता समजतील आणि लाभ होईल. आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल. कार्यालयीन कामे पूर्ण कराल.

मिथुन

आज शरीर आणि मन बेचैन राहील असे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. मानहानी होण्याची शक्यता आहे. संतती विषयक कामात खर्च करावा लागेल. पचनसंस्येचे विकार बळावतील. जोडीदाराच्या तब्बेतीची पण चिंता वाटेल. विद्यार्ध्यांसाठी फार चांगला दिवस. कामुकता वाढेल. यात्रा- प्रवासासाठी काळ अनुकूल नाही.

कर्क

श्रीगणेश सांगतात की आपला आजचा दिवस अशुभ आहे. आज आनंद आणि उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले व अशांत राहील. घरात भांडणाचे वातावरण असेल. आप्तांबरोबर मतभेद होऊ शकतात. स्त्रियांबरोबर सुद्धा मतभेद व तणाव राहील. पैसा खर्च होईल. अपयश मिळेल. जेवण वेळेवर मिळणार नाही. झोपही शांत मिळणार नाही. समाजात अपमान होणार नाही याची काळजी घ्या, असे श्रीगणेश सुचवितात.

सिंह

श्रीगणेश सांगतात की आपल्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज आरोग्य चांगले राहील. भाऊबंदाबरोबर आनंदात वेळ जाईल. त्यांच्याकडून फायदा होईल. एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. कार्य यशस्वी झाल्याने मित्र आनंदी होतील. भावुक संबंध प्रस्थापीत होतील. कलाक्षेत्रात रुची राहील. मानसिक दृष्टया दिवस चांगला जाईल.

कन्या

आजचा दिवस आपल्याला शुभफल देईल. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्यासोबत सुखात दिवस जाईल. आर्थिक लाभ होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील. प्रवासाचे बेत ठरतील. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल पण वाद टाळा. मिष्टान्न भोजन मिळेल. आयात- निर्यात संबंधात यश मिळेल.

तुळ

श्रीगणेश सांगतात आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक आणि कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या. सृजनात्मक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आर्थिक योजना ठरवाल. प्रिय व्यक्तींबरोबर दिवस आनंदात जाईल. अलंकार, मनोरंजन, आनंद यासाठी पैसा खर्च होईल. आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक

दुर्घटनेपासून सावध राहण्याचा, शस्त्रकियेचा निर्णय न घेण्याचा आणि वादात न पडण्याचा इशारा श्रीगणेश देतात. बोलण्यात कोणाचा अपसमज होऊ नये याकडे लक्ष द्या. शारीरिक कष्ट आणि मानसिक चिंता यामुळे त्रस्त व्हाल. हर्ष आनंदासाठी खर्च करावा लागेल. घरातील व्यक्तींशी भांडणाचे प्रसंग उदभवतील.

धनू

आजचा दिवस आपणाला लाभदायक ठरेल असे गणेश सांगतात. गृहस्थ जीवनाचा पूर्णतः आनंद घ्याल. मित्रांसमवेत रम्य ठिकाणी प्रवासाचा बेत आखाल. उत्पन्नात वाढीचे योग आहेत. चांगल्या भोजनाचा आस्वाद घ्याल.

मकर

आज व्यापारविषयक कामात आपणाला लाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इ. साठी दिवस चांगला आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. पण अग्नी, पाणी, अचानक आपत्ती यापासून सावध राहा. व्यावसायिक कार्यासाठी धावपळ होईल. संततीच्या अभ्यासातील प्रगतीमुळे संतुष्ट व्हाल, प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ

आजचा दिवस संमिश्र फलदायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी राहील त्यामुळे काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी पण आपणाला खुपेल. हर्षोल्हासासाठी पैसा खर्च होईल. प्रवास घडू शकतील. परदेशातून बातम्या येतील. संततीची मात्र काळजी वाटेल.

मीन

ईश्वरभक्ती आणी आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष देवून दिवस घालवा असे श्रीगणेश सांगतात. आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. तब्बेतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणावर अधिक खर्च करावा लागेल. घरातील सर्वांशी संयमाने वागा. अचानक धनलाभ आपल्या मनावरील भार जरा कमी करेल. व्यापार्‍यांची जुनी येणी वसूल होतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click