January 29, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष- लोकांना तुमचे म्हणणे पटवून देण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. आरोग्याची काळजी घ्या.प्रवासात दगदग होईल, आर्थिक स्थिती चांगली राहील.

वृषभ- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद होईल. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. एकंदरीत चांगला दिवस आहे.

मिथुन- घरी पाव्हण्या-रावळ्यांचा आदळ राहील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. नोकरीत अनुकूल घटना घडतील. काही बदल होतील. नवीन नोकरीचे प्रयत्न फलद्रूप होतील.

कर्क- नातेवाईक, स्नेहीजन यांच्या सहवासात याल. घरात आनंदी वातावरण राहील. नवीन वस्तू खरेदी कराल. देवदर्शन करण्याच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. प्रेमात असाल तर घरी सांगण्यास हरकत नाही. जीवनसाधीशी मधुर संबंध राहतील.

सिंह- संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक आवक चांगली राहील. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी आवश्यक तो वेळ द्यावा लागेल. खाण्याचे तंत्र सांभाळा. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. व्यवस्थित नियोजन करून प्राधान्यक्रम ठरवून कामे करा.

कन्या- ग्रहमान अनुकूल राहील. यश तुमचेच राहील. महत्त्वाचे निरोप येतील. अपेक्षित संधी मिळतील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात भरभराट होईल. कामाच्या घबडग्यात स्वतःसाठीपण थोडा वेळ काढा. प्रगतीच्या वाटेवरील अडचणी कमी होतील.

तूळ- महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल. अन्यथा पैसा खर्च होईल. मनस्ताप सहन करावा लागेल. त्यापेक्षा संयम ठेवलेला बरा. नोकरीत जास्त कष्ट करावे लागतील. काहींना प्रवास करावा लागेल. घरातील सदस्यांशी समन्वय ठेवा. त्यांना काय हवे नको ते पाहा.

वृश्चिक- मनातील काळजी निघून जाईल. आश्वासक लोकांच्या संपर्कात राहा. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. अनेक मार्गानी धनप्राप्ती होईल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. स्नेहीजनांचे सहकार्य मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

धनू- नोकरीत आघाडीवर राहाल. महत्त्वाच्या प्रकल्पात तुमच्यासाठी चांगली संधी चालून येईल. तुमचा अभिप्राय महत्त्वाचा ठरेल. घर, जमीन खरेदीचे मनसुबे यशस्वी होताना दिसतील. कामाचा व्याप वाढेल. एखाद्या मेजवानीच्या कार्यक्रमाला जाल.

मकर- नशिबाची साथ राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांची मदत होईल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. महत्त्वाची कामे पुढे ढकला. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.

कुंभ- संमिश्र ग्रहमान राहील. काही कारणाने थोडे गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. पैशाची गरज नसताना उधळपट्टी करू नका. बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवा. सगळे तुमचे ऐकतीलच असा अट्टहास करू नका.

मीन- चांगल्या बातम्या कानावर पडतील. महत्त्वाचे निरोप येतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. काही अलभ्य लाभ होतील. महत्त्वाचे काम होईल. अनेकांचे सहकार्य मिळेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click