August 16, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

साहित्य निर्मिती आणि कलात्मक अभिव्यक्ती वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, असे श्रीगणेश सांगतात.स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांच्या भावनांशी आपल्या भावनांचा संघर्ष होईल. कामाच्या ठिकाणी आणि वरिष्ठ अधिकार्यांसमोर सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

वृषभ

आईच्या तब्बेतीविषयी आज चिंता राहील. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार सोडून द्या. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ. सृजनशीलता वाढेल. हातून एखादे धार्मिक कार्य घडेल.

मिथुन

कार्य यशस्वी झाल्याने आपले मन आज आनंदी असेल. तुमच्याकडून प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. परंतु दुपारनंतर घरात मतभेद होतील. कुटुंबियांशी झालेल्या वादातून मन खिन्न बनेल. आईची प्रकृती बिघडेल. नकारात्मक विचारांमुळे हतबल होणार नाही याची काळजी घ्या. दुपारनंतर भाग्यवृद्धीचे संकेत आहेत.

कर्क

दीर्घकालीन योजनेच्या आयोजनासंबंधी विचार करताना मनःस्थिती द्विधा होईल. कुटुंबियांसोबतचे वातावरण तणावपूर्ण असेल. ठरवलेल्या कामात अपेक्षित यश मिळेल असे गणेशजी सांगतात. दुपारनंतर आपल्यासाठी चांगली वेळ आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. भावा बहिणीकडून लाभ मिळेल. कुणाबरोबर तरी भावनिक संबंध दृढ होतील व त्यामुळे मन शांत होईल.

सिंह

आज आपल्यामनात पक्का आत्मविश्वास असेल असे श्रीगणेशजी म्हणतात. आज आपले प्रत्येक काम दृढ निर्णयशक्तिनी पूर्ण असेल. तरीही मनात क्रोधाची भावना अधिक असेल, म्हाणून मन शांत ठेवा. सरकारी कामातून फायदा मिळेल. कुटुंबियांचे सहकार्य राहील. मिळकतीपेक्षा खर्च जास्त होईल.

कन्या

आज आपले मन खूप भाऊक बनेल. भावनेच्या आहारी जाऊन काही अविचारी काम आपल्या हातून होऊ नये यासाठी सावध रहा. वादविवाद टाळा. तरीसुद्धा एखाद्या बरोबर उग्र वर्तन घडू शकते. दुपारनंतर तुमच्यात आत्मविश्वास वाढतोय असे लक्षात येईल. समाजात मान वाढेल, प्रतिष्ठा मिळेल. तरीही क्रोध आवरा.

तुळ

आजचा दिवस आपल्याला प्रवास- सहलीला जाण्याचा तसेच मित्रांकडून फायद्याचा आहे. व्यापारात लाभ होईल. मुलाबाळांबरोबर चांगले संबंध राहतील. परंतु, दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. अधिक संवेदनशील होऊ नका असे गणेशजी सांगतात. तीव्र वाद- विवादापासून सांभाळून. भ्रमापासून दूरच रहा. फायद्याविषयीचे निर्णय सांभाळून घ्या.

वृश्चिक

मनोबल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आज प्रत्येक काम सहजपूर्ण होईल. व्यापार- धंदयात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. आपल्या कामामुळे वरिष्ठ आनंदित होतील व त्यामुळे पदोन्नतीची शक्यता वाढेल. वडीलां बरोबर आपले संबंध चांगले राहतील व त्यांच्याकडून फायदाही संभवतो. दुपारनंतर आपण काही विचारात गुरफटाल. व्यापारात लाभाचे योग. मित्रांकडूनही फायदा होईल.

धनू

आज आपली वृत्ती धार्मिक बनेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी व्हाल. न्यायप्रिय बनाल हानिकारक कामापासून दूर रहा. रागावर ताबा ठेवा. दुपारनंतर आपला दिवस खूप चांगला व यशस्वी जाईल. तुमची कामे सहजगत्या पूर्ण होतील. व्यवसाय धंद्यात वरिष्ठ, प्रोत्साहन मिळाल्यामुळे पदोन्नती देतील. घरगुती वातावरण खेळीमेळीचे असेल.

मकर

आजचा दिवस सांभाळून रहा, असे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीविषयी निष्काळजी राहू नका व नकारात्मक विचारांना वरचढ होऊ देऊ नका. असे केले तरच आपण हानीतून बाहेर पडाल. अचानक येणार्‍या खर्चासाठी मनाची तयारी ठेवा. दुपारनंतर परिस्थितीत थोडी सुधारणा संभवते. एखाद्या दुसच्या धार्मिक स्थळाला भेट दिली तर मनाला शांती मिळेल. स्वभाव उग्र व संतापी बनेल, तरी त्यावर संयम ठेवा.

कुंभ

आज लहानसहान गोष्टींवरुन वैवाहिक जीवनात गोष्टी विकोपाला जाऊ शकतात, असे श्रीगणेश सुचवतात. संसारातील प्रश्नांविषयी आज आपण उदासीन रहाल. कोर्ट-कचेरी पसून जरा जपूनच. समाजाच्या दृष्टिने अपमानीत होणार नाही याची काळजी घ्या. नवीन कामाची सुरुवात करा असा गणेशजींचा आपल्याला सल्ला आहे. स्फूर्ती आणि प्रसन्नतेचा अभाव राहील व मनाला उद्विग्नता येईल. ईश्वरभक्ती, अध्यात्मिकता मनाला शांती देईल.

मीन

आज मन चिंतामुक्त राहील. शंकाकुशंकामुळे प्रसन्नता जाणवणार नाही. कार्यांत विघ्ने आल्याने कार्य पूर्ण होण्यास वेळ लागेल. सहकार्यांकडून सहकार्य मिळणार नाही. वैवाहिक जीवनात कटकटीचे वातावरण लांबणार नाही याची काळजी घ्या. व्यापारांतील भागीदारांपासून संभाळूनच रहा. संसारातील विषयांपासून मन अलिप्त राहील. कोर्टाच्या विषयांपासून दूरच रहा असा श्रीगणेशजी सल्ला देताहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click