October 4, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष
शनिवारी मारुतीला तेल वाहा. मानसिक स्वास्थ्य जपा. आज सकाळचा दिवस थोडा कंटाळवाणा गेला तरी सायंकाळी जोडीदारासोबत मजेत वेळ घालवला.नव्या योजना अंमलात आणण्याकरिता प्रयत्न कराल. आज कुटुंबिय त्यांच्या अडचणी तुम्हाला सांगतील.
शुभरंग : आकाशी

वृषभ
आहारात सैंधव मीठ, आलं, खजूर, काळीमिरी या पदार्थांचा वापर करा. अचानक धनलाभाचा योग आहे. आज पहिल्या भेटीतच तुम्हाला एखादी व्यक्ती आवडू शकते. परसात तुळशीचे रोप लावून त्याला रोज सकाळी पाणी घाला. जोडीदारासोबत असलेले तुमचे प्रेमाचे नाते पुन्हा नव्याने बहरेल.
शुभरंग : हिरवा

मिथुन
कुमारिकांना शेवयांची खीर खाऊ घाला. आजचा दिवस सुखदायक असेल. मित्रमंडळी तुम्हाला समजून घेतील. कार्यालयात सावधगिरी बाळगा. वेळ वाया घालवू नका.
शुभरंग : काळा

कर्क
शारीरिकदृष्ट्या सक्षम राहाण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायला जा. आई-वडील पैसे वाचवण्याचा सल्ला देतील. आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग घडू शकेल. कामावर लक्ष केंद्रित केल्यास प्रतिष्ठा प्राप्त करू शकाल. धार्मिक कार्यात यथाशक्ती दान करा.
शुभरंग : पिवळा

सिंह
शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपा. पैसे उधार देऊ नका. शेजाऱ्यांशी भांडण करू नका. कांदा किंवा लसूण वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. पारिजातकाच्या झाडाला पाणी घालून मनातली इच्छा सांगा. नाती जपण्यासाठी प्रयत्न करा.
शुभरंग: निळा

कन्या
अत्तर, अगरबत्ती, कापराचे दान करा. तुम्ही केलेले एखादे छोटेसे काम तुमचा उत्साह वाढवेल. आपल्या आयुष्यातील मार्गदर्शक व्यक्तिंप्रती कृतज्ञ राहा. आज ठरवलेली कामे मनाप्रमाणे होतीलच असे नाही. सायंकाळी आवडीचा पदार्थ बनवून खाल.
शुभरंग : जांभळा

तूळ
मारुतीची पूजा करा. आज आरोग्य चांगले राहिल. जुन्या आठवणीत वाहावत जाऊ नका. समाजातील लोकांवर आपला प्रभाव पडेल. गरजू लोकांसमोर मदतीचा हात पुढे करा. यशप्राप्तीसाठी निश्चयाचे पाऊल उचलण्याची गरज आहे.
शुभरंग : खाकी

वृश्चिक
घरातील अडचणींकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. तुमच्या वागणुकीमुळे इतरांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षून घ्याल. तुमच्याकडून झालेला निष्काळजीपणा महागात पडू शकतो. पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या ठिकाणी प्रवास कराल. तेथील महत्त्वाच्या व्यक्तिंशी भेट होण्याचा योग आहे. अनावश्यक विचार मनातून काढून टाका.
शुभरंग : गुलाबी

धनु
आजचा दिवस स्फूर्तिदायक जाईल. स्वत:साठी वेळ काढा. आराम करा. राहून गेलेली काही कामे उद्या पूर्ण करा. घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्या. ज्या मित्रपरिवारासोबत केव्हातरीच भेट होते त्यांना भेटण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
शुभरंग : लाल

मकर
रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी घराजवळील झाडांना घाला. पैसे जपून वापरा. जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या संकल्पना सुचतील. आजचा दिवस जोडीदारासोबत मजेत घालवाल. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल.
शुभरंग : नारिंगी

कुंभ
आजचा दिवस स्फूर्तिदायक असेल. स्वत:साठी वेळ काढाल. कोणालाही अनावश्यक घाबरू नका. धैर्याने प्रसंगांना सामोरे जा. प्रिय व्यक्तीला पांढऱ्या रंगाची भेटवस्तू द्या. नवा व्यवसाय सुरू करू शकाल. दिवसभर कामात व्यस्त राहाल.
शुभरंग : चॉकलेटी

मीन
आज मित्रमंडळींसोबत फिरायला जाल. मानसिक तणाव दूर होण्याकरिता ध्यानधारणा कराल. घरातील कामांमुळे थकवा येण्याची शक्यता आहे. घरात अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू जागच्या जागी लावून ठेवाल. कुटुंबियांशी वादविवाद घालू नका.
शुभरंग : तांबडा

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click