March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष- ज्येष्ठांचा सल्ला ऐकणे योग्य ठरेल. त्यामुळे फायदा होईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. आत्मविश्वासाने कामे कराल. घरी पाहुणे येतील. नोकरीत अचानक मोठी संधी चालून येईल.मात्र त्यासाठी दगदग, धावपळ होईल. विविध प्रकारचे लाभ होतील.

वृषभ- कुणाचा अपमान होईल असे बोलू नका. निष्कारण लोकांना दुखवू नका. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. जवळचे प्रवास होतील. व्यवसायात गुंतवणूक कराल. त्यातून फायदा होईल. आर्थिक आवक चांगली राहील.

मिथुन- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. जमिनीचे व्यवहार सफल होतील, व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. वरिष्ठाचे सहकार्य मिळेल. घरातील सदस्याशी समन्वय ठेवणे आवश्यक आहे.

कर्क- मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तू मिळतील. नोकरीत ताणतणाव राहील. तब्येतीची काळजी घ्या. थोडे संयमाने वागणे आवश्यक, लोकांशी संवाद साधा. गैरसमज करून घेऊ नका. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे हे लक्षात घ्या.

सिंह- खर्चावर नियंत्रण ठेवा. दगदगीची कामे टाळा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. आर्थिक आवक चांगली राहील, जीवनसाथीशी वादविवाद टाळणे बरे राहील.

कन्या- अनुकूल परिस्थिती राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. योग्य सल्ला मिळेल. चांगल्या लोकांच्या सहवासात याल. आर्थिक आवक मनासारखी राहील. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील. आवडत्या छंदासाठी वेळ काढा.

तूळ – घरी पाव्हण्या रावळ्यांचा आदळ राहील. त्यांच्या सरबराईत वेळ जाईल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. काही बदल होतील. तुमचे वर्चस्व राहील. घरात तुमचा अभिप्राय महत्त्वाचा ठरेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलांशी संवाद साधा. त्यांच्या प्रगतीचा आढावा घ्या.

वृश्चिक – भाग्याची चांगली साथ राहील. कामानिमित्त प्रवास घडून येतील. प्रवास कार्य साधक ठरतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. मानसन्मान मिळेल. महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील.

धनू- महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवास शक्यतो टाळा. दगदगीची कामे करणे टाळा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. काहीना बढती मिळू शकते. आर्थिक बाजू बळकट राहील. व्यवसायात भरभराट होईल.

मकर- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. भेटवस्तूची देवाण-घेवाण होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. व्यवसायात तुमचे महत्त्व वाढेल. किरकोळ अडचणी दूर होतील.

कुंभ- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. व्यवसायात भरभराट होईल. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च कराल. मात्र आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.

मीन- कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल, सर्वांचे सहकार्य मिळेल, विविध प्रकारचे लाभ होतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मित्र, मैत्रिणीच्या सहवासात मजेत वेळ जाईल. आर्थिक आवक चांगली राहील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click