April 1, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत, कारण आज पैसा खर्च होण्याचे योग आहेत.पैसे आणि देवाण- घेवाण या विषयी सावधानी बाळगा. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्या. आप्तेष्टांशी मतभेद होण्याची आणि आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मध्यम फलदायी दिवस.

वृषभ

श्रीगणेशाच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक आणि कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. त्यामुळे मन लावून काम कराल. आर्थिक जवाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आर्थिक आयोजन कराल. अलंकार, सौंदर्य प्रसाधने आणि मनोरंजन यांवर खर्च कराल. कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ घालवाल. आत्मविश्वास वाढेल.

मिथुन

श्रीगणेश सावध करताना आपणाला सांगतात की आजचा दिवस कष्टप्रद असल्याने प्रत्येक कामात सावध राहा. कुटुंबीय आणि संततीशी पटणार नाही. आवेश आणि संतापावर नियंत्रण ठेवा म्हणजे कामे बिघडणार नाहीत. शरीर प्रकृती बिघडेल. डोळ्यांचा त्रास जाणवेल. दुर्घटना, अचानक खर्च याला तोंड द्यायला तयार राहा. भाषा व व्यवहारात नरमाई ठेवा.

कर्क

आजचा दिवस आपणासाठी लाभदायक आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. जीवनसाथी व संततीकडून सुख मिळेल. विवाहयोग आहेत. संततीशी सुसंवाद राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. चिंता दूर होतील. मित्रांसमवेत एखाद्या नैसर्गिक स्थळी जाण्याची योजना आखाल. भोजनाचा आनंद मिळेल.

सिंह

श्रीगणेश सांगतात की व्यवसायाच्या दृष्टिने आजचा दिवस श्रेष्ठ आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. पैतृक लाभाचे संकेत आहेत. सरकारी कामात फायदा होईल. तब्बेत चांगली राहील. वैवाहिक जीवनात गोडी वाटेल. घर, जमीन व मालमत्तेचे व्यवहार यशस्वी होतील.

कन्या

आजचा दिवस चांगला जाईल. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता. धार्मिक कार्य व धार्मिक यात्रा यांत मग्न राहाल. परदेशास्थित आप्तेष्टांकडून आनंदाच्या वार्ता मिळतील. बहीण- भावांकडून लाभाची शक्यता. आर्थिक लाभाचा दिवस.

तुळ

आज नवे कार्य हाती घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. बोलणे आणि कृती यांवर संयम ठेवणे हितावह ठरेल. द्वेषापासून दूर राहा आणि हितशत्रूपासून जपा. तब्बेतीकडे लक्ष द्या. रहस्यमय बाबी आणि गूढविद्येकडे आकर्षित व्हाल. आध्यात्मिक यश प्राप्त करण्यास चांगला काळ. शक्यतो स्त्री आणि पाण्यापासून दूर राहा. सखोल चिंतन मनाला शांती देईल.

वृश्चिक

आजचा दिवस काहीसा वेगळाच जाईल. स्वतःसाठी वेळ काढाल. मित्रांबरोबर प्रवास, मोज-मजा, मनोरंजन आणि छोटया सहली तसेच भोजन, वस्त्रप्रावरण इ. मुळे आपण खूप आनंदी राहाल. मान- सम्मान वाढेल आणि सत्कार होण्याची शक्यता. वाहनसुख मिळेल. प्रियव्यक्तिची भेट झाल्याने मन आनंदी राहील. वैवाहिक सुख चांगले मिळेल.

धनू

श्रीगणेश सांगतात की आज आर्थिक लाभाचा दिवस आहे. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. नोकरदारांना नोकरीत लाभ आणि सहकार्यांचे सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. तब्बेत चांगली राहील. हाताखाली काम करणार्‍यांचे सहकार्य मिळेल. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. वाणीवर संयम ठेवा. मैत्रिणींची भेट होईल.

मकर

आज आपले मन चिंताग्रस्त व द्विधा अवस्थेत राहील असे श्रीगणेश सांगतात. या मनःस्थितीत कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. दैव अनुकूल नसल्याने आज कोणतेही महत्वपूर्ण काम करू नका. मुलाबाळांच्या आरोग्याची काळजी राहील. वडीलधार्‍यांची तब्बेत बिघडेल. कार्यालयात वरिष्ठांच्या खपामर्जीला तोंड दयावे लागेल. अनावश्यक खर्च वाढतील संततीशी मतभेद होतील.

कुंभ

आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. धनप्राप्ती संबंधी योजना आखाल. स्त्रीयांचा अलंकार, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने यांवर पैसा खर्च होईल. मातेकडून लाभाची शक्यता. जमीन, घर आणि वाहन इ. चे व्यवहार ठरविताना दक्ष राहणे अत्यावश्यक आहे. विद्यार्जन करणार्‍यांना विद्याप्राप्ती होईल. हट्टीपणा करू नका.

मीन

श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस शुभ फलदायक जाईल. आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस शुभ आहे. जोडीदारा सोबत दिवस आनंदात जाईल. मित्रांसोबत छोटीशी सहल आयोजित कराल. भावंडांकडून लाभ होईल. कार्यात यश मिळेल. मान- सम्मान होतील. आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click