December 6, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष: आर्थिक आवक चांगली राहील. वसुलीसाठी जास्त तगादा लावावा लागेल. जमिनीच्या व्यवहारात खबरदारी घेतली पाहिजे. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे तंत्र सांभाळा.अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील.

वृषभ: महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील. मात्र, डोक्याला काही ना काही वैताग राहील. सहजासहजी कामे होणार नाहीत. त्यामुळे थोडा संयम ठेवलेला बरा. नोकरीत प्रगती होईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.

मिथुन: दगदग होईल अशी कामे करू नका. अनाठायी खर्च झाल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. वेळ आणि पैसा खर्च होईल. प्रवास शक्यतो टाळा. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

कर्क: नोकरीत चांगली परिस्थिती राहील. काही फायदे होतील. कुणी एखादा प्रस्ताव दिला तर त्याचा अंतस्थ हेतू काय हे लक्षात घ्या. कधी कधी वरकरणी फायदा दिसत असला तरी प्रत्यक्षात वेगळेच असते. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल.

सिंह: नोकरीत बदल होतील. कामाचे स्वरुप बदलेल. कामाचा ताण वाढेल. धावपळ होईल. घरी लोकांची ये-जा चालू राहील. आराम करण्यास वेळ मिळणार नाही. मात्र, यश मिळाल्याचे समाधान वाटेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या: परिस्थिती हळूहळू प्रगतीपथावर येईल. मात्र, काही कामे पूर्ण करताना अडचणी येतील. सबुरीने वागण्याची गरज आहे. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी व्यक्तींना तुमची माहिती सांगू नका. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील.

तूळ: महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. फार दगदग करू नका. वाहने जपून चालवा. काम लगेच पूर्ण झाले पाहिजे, असा अट्टाहास करणे सध्याच्या परिस्थितीत योग्य ठरणार नाही. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.

वृश्चिक: जीवनसाथीची काळजी घ्या. वादविवाद टाळा. व्यवसायात विक्री चांगली राहील. महत्त्वाच्या कामातील अडचणी कमी होतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. महत्त्वाच्या कामात तुमच्या नावाचा विचार केला जाईल.

धनु: धनलाभाच्या संधी चालून येतील. आर्थिक फायदे होतील. आरोग्याची काळजी घ्या. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांशी सख्य राहील. जुने स्नेही भेटतील. त्यांच्याशी गप्पाटप्पा होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मनासारखे भोजन मिळेल.

मकर: ग्रहमानाची बऱ्यापैकी साथ राहील. सगळे काही मनासारखे घडणार नाही; पण तरीही ताण कमी राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात काळजी घ्या. फार धावपळ करू नका.

कुंभ: नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. थोडे मुत्सद्दीपणाने वागून वेळ निभावून नेण्याची गरज आहे. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रेमात असणाऱ्यांना गैरसमजांना तोंड द्यावे लागेल.

मीन: आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात अचानक बदल होऊ शकतात. काही अडचणी येतील. फार मोठे धाडस करू नका. भावंडांशी गैरसमज होतील. वादाचे प्रसंग येतील. जमिनीचे व्यवहार पार पडतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click