February 2, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – आज जे कोणतं काम कराल त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. पैशांच्या बाबतीत अनेक विचार मनात येतील. ज्या आधारे तुम्ही तातडीनं एखादा निर्णय घ्याल.मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे.

वृषभ – कामाच्या व्यापासोबतच जबाबदारी वाढेल. दिवसभर व्यग्र असाल. अचानक यशशिखरांवर पोहोचण्याची संधी आहे. बऱ्याच अंशी तुम्ही यशस्वी ठराल. एखाद्या कार्यक्रमाचा बेत लगेचच आखला जाऊ शकतो. सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल.

मिथुन – आज धैर्यानं काम करा. दिवसभर पैशांचा विचार करत राहाल. धनलाभ होण्याचा योग आहे. एखादं नवं काम पूर्णत्वास न्याल. प्रगतीचाच विचार मनात घर करुन असेल. आरोग्याची काळजी कमी होईल. उत्तम अन्नाचे सुख मिळेल. मित्र आनंद देतील. महत्वपूर्ण आयोजन होण्याची शक्यता आहे. भेट मिळू शकते.

कर्क – अचानक धनलाभ होईल. अडकलेले पैसेही परत मिळतील. मित्रांना मदत करण्यासाठी तयार राहा. कोणासोबत कोणताही वाद असल्यास तो मिटवण्याचा प्रयत्न करा. मानसिक सुख-शांतिचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.

सिंह – एखादं महत्त्वपूर्ण काम करण्याला प्राधान्य द्या. जुनी कामं आवरण्याला प्राधान्य द्या. अविवाहितांसाठी प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. एखाद्या जिवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील.

कन्या – आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरी आणि व्यवसायात काही मोठी आणि आवश्यक ते बदल घडतील. महत्त्वाकांक्षा वाढेल. मेहनत करा, समजुतदारपणे निर्णय़ घ्या. फायदा होईल. मनावरील दडपण कमी होईल. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. मान-सन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल.

तुळ – नोकरी किंवा व्यवसायामध्ये एखादं नवं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. कामात नवे प्रयोग कराल. जोडीदारासमवेत काही बेत आखाल. कौटुंबीक सुख मिळेल. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. अनोळखी व्यक्तीशी फोनवर बोलणे तुम्हाला अडचणीत आणू शकते.

वृश्चिक – विचाराधीन कामं पूर्ण होतील. आज अडकलेली कामं पूर्णत्वास नेण्यासाठी चांगला दिवस आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कर्जरुपी दिलेले पैसे परत मिळणार आहेत. सौंदर्याकडे आकर्षण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम. वाद-विवाद किंवा प्रतिस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.

धनु – तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही अशा गोष्टी समोर येऊ शकतात ज्यांचा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. दिवस चांगला आणि भरभराटीचा आहे. विशिष्ट व्यक्तींच्या संपर्कात सहयोग मिळेल. आपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा.

मकर – नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी आजचा दिवस चांगला आहे. नव्या नोकरीमध्ये यश मिळेल. तुमच्या मदतीसाठी सर्वजण तयार असतील. व्यापारात आपणास कमी प्राप्ती होईल पण नुकसान मोठे होईल. जर आपणास एका कार्यात वाढ मिळाली तर इतर कार्यात अवनती होणे शक्य आहे.

कुंभ -लेखन संबंधी विषयांमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील. महत्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस भरभराटीचा आहे. कुटुंबाला वेळ देण्यासाठी ही योग्य संधी आहे. एखादी शुभवार्ता मिळेल.

मीन – जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. जुने वाद मिटतील. स्वत:ची काळजी घ्या. सक्रियता वाढेल. समाज आणि कुटुंबात तुमचा मान वाढेल. एखादी कल्पना डोक्यात घर करु शकते. खर्चावर ताबा ठेवा.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click