August 16, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. काही कामे प्रगतीपथावर राहतील. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. इतरांना अनाहूत सल्ले देऊ नका. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल.आपल्या भावी योजना लोकांना सांगू नका.

वृषभ – चांगल्या संधी चालून येतील. नोकरीत नेहमीपेक्षा जास्त परिक्षम करावे लागतील. आर्थिक आवक चांगली राहील. कामात उत्साह राहील. जीवनसाथीच मोलाची साथ देईल. नातेवाईक, जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील.

मिथुन – काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. बाजारपेठेचे तुमचे अंदाज बरोबर ठरतील. महत्त्वाचे निरोप येतील. आरोग्य चांगले राहील. कामात उत्साह राहील. ज्यांना जवळचे समजता असे लोक पाठ फिरताच तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील.

कर्क – जीवनसाथीची प्रगती होईल. मनातील काळजी दूर होईल. प्रेमात असाल तर घरी सांगण्यास हरकत नाही. काहींना भेटवस्तू मिळतील. मित्र मैत्रिणींच्या सहवासात मौजमजा करण्यात वेळ जाईल. गृहसौख्य चांगले राहील. आळस झटकून कामे करणे आवश्यक आहे.

सिंह – जवळच्या लोकांशी गैरसमज होतील. आपणच पुढाकार घेऊन संवाद साधल्यास समस्या दूर होतील. कुणाला अपमान होईल असे बोलू नका. वेळेचा सदुपयोग केला तर प्रगती कराल. कामात उत्साह राहील. जवळचा प्रवास घडून येईल.

कन्या – धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. थोडे सबुरीने वागण्याची गकज आहे. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अट्टहास करू नका. मानसन्मान मिळेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल.

तूळ – नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या कामाचे योग्य मूल्यमापन केले जाईल. त्यामुळे कामाचा ताण जाणवणार नाही. भावंडांशी गैरसमज होतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक आवक सामान्य राहील.

वृश्चिक – नोकरीत कामाचा ताण कमी होईल. एखाद्या सौद्यात फायदा होईल. आवडत्या व्यक्तीसाठी जास्त वेळ द्याल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. इतरांच्या भानगडीत पडू नका. मालमत्तेच्या कामात फायदे होतील.

धनू – जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. त्यामुळे आनंद होईल. जीवनसाथीला नाराज करू नका. वेळ वाया घालवू नका. कामाची यादी बनवून एक एक काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन करा. आर्थिक व्यवहार जपून करा.

मकर – जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. गृहसौख्य चांगले राहील. प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. गोपनीय माहिती कुणाला सांगू नका. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल.

कुंभ – व्यवसायात भरभराट होईल. अनपेक्षित फायदे होतील. हाती घेतलेले काम पूर्ण कराल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. खाण्यापिण्याचे पथ्य पाळले पाहिजे. आपले कोण परके कोण हे ओळखा.

मीन – आर्थिक आवक चांगली राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अधिकारी वर्ग तुमच्याकडे अपेक्षेने पाहील. हितशत्रूपासून सावध राहा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click