February 2, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – तुम्ही एखाद्या परीक्षेला बसत असाल तर नियोजनबद्ध अभ्यास करणं गरजेचं आहे.काही नवीन मित्र प्रयत्नपूर्वक तुमच्यावर प्रभाव टाकतील. तुमच्या कामावरच्या निष्ठेचं वरिष्ठांकडून प्रशंसा होईल.

वृषभ – तुम्हाला आलेला राग दडपल्यानं मन अस्वस्थ होईल. आज हे टाळण्याचा प्रयत्न करू शकता.परिस्थितीला इतक्या सहजपणे शरण जाऊ नका. लढणं हाच पर्याय आहे.

मिथुन – तुम्ही नेहमीच बारकाईने काम करता. तुमच्या या गुणामुळे तुम्ही नेहमीच कौतुकाला पात्र ठराल.तुम्ही अनेकदा प्रशंसा मिळवत राहाल. तुमच्या जवळची व्यक्ती किंवा तुम्ही ज्या व्यक्तीसोबत नात्यात आहात ती नेहमीपेक्षा अधिक प्रतिसाद देत असल्याचं जाणवेल. नृत्य ही एक चांगली थेरपी ठरू शकेल.

कर्क – आर्थिक बाबतीत फार प्रगती होत नसल्यानं त्रास होऊ शकतो.त्यामुळे विचार न करता निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त होण्याची शक्यता अधिक आहे; मात्र थोडा धीर धरणं आवश्यक आहे. काही काळानंतर गोष्टी सुधारतील. पुन्हा भूतकाळाप्रमाणेच आताही यशाचा अनुभव घेता येईल.

सिंह – एकाच प्रकल्पावर सगळं लक्ष केंद्रित करण्याची इच्छा होणार नाही किंवा त्यासाठीच सगळे प्रयत्न करावेसे वाटणार नाहीत; मात्र असं करण्यानं मिळणारा फायदा मोठा असेल.तुम्ही स्वतःलाच दिलेलं एखादं वचन पूर्ण करा. परदेशी असलेले नातेवाईक तुम्हाला भेटायला येण्याची शक्यता आहे.

कन्या – तुम्‍हाला सध्याची परिस्थिती खूपच त्रासदायक वाटू शकते. परंतु लवकरच सगळ्या गोष्टी सुरळीत होतील.प्रशंसा करणं सगळ्यात कठीण असतं, ती सगळ्यात महागडी भेट असते. तुम्हाला ही भेट मिळू शकते. हे आजच्या दिवसाचं सर्वांत मोठं आकर्षण असेल. एखाद्या गोष्टीला तुम्ही दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद तुमचा ठसा उमटवेल.

तूळ – आनंद आणि थोडी निराशा असे दोन्ही अनुभव देणारा हा दिवस असेल. आयुष्यभर उपयोगी पडेल असा एखादा महत्त्वाचा धडा शिकाल; मात्र त्यातून पुढच्या वेळी काळजी घ्या. आरोग्याची नियमित काळजी घेणं आवश्यक आहे.

वृश्चिक – इतर व्यक्ती कदाचित तुम्हाला आत्ता पूर्णपणे समजू शकणार नाहीत.तुमचं काम अधिक प्रभावी करण्यासाठी तुम्हाला नवीन मोडस ऑपरेंडी वापरावी लागेल. तुम्ही पॅटर्नमध्ये अडकले असाल.

धनू -तुमचे वरिष्ठ तुमच्या इच्छेविरुद्ध तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी भाग पाडू शकतात. तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.घरातली एखादी व्यक्तीही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करू शकते.

मकर -गृहिणींना रोजच्या रुटीनचा कंटाळा आल्यानं बदलाची गरज वाटेल. आपल्या मार्गानं पुढं जात राहणं हे ध्येय असलं तरी आपल्या कार्याची ओळख निर्माण होण्याची अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांना जाणवेल. रोख रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे.

कुंभ -तुमच्या कामसू वृत्तीमुळे काम लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. साधा-सरळ दृष्टिकोन ठेवून, कुशलतेने परिस्थिती हाताळल्याने इतरांना फायदा होईल. तुमची निवड कदाचित सर्वांना आवडणार नाही; पण ती नक्कीच वेगळी असेल.

मीन -तुम्ही एखाद्याला लिखित स्वरूपात एखाद्या गोष्टीच्या पूर्ततेचं वचन दिलं असेल आणि तरीही ते पूर्ण केलं नसेल तर ते तुमच्यासमोर अडचणी निर्माण करू शकतात.सगळीकडे या गोष्टीची चर्चा करू नका. कोणाशीही बोलताना सावधगिरी बाळगा. कोणी तरी तुमच्या किंवा तुमच्या कामाच्या विरोधात योजना आखण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click