March 30, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – थोरा-मोठ्यांच्या सहवासात याल. त्याची मदत मिळेल. प्रवासात दगदग होईल. महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकलणे ठीक राहील. मालमत्तेच्या कामात कटकटी होतील. जोडीदाराचे सकारात्मक पाठबळ व सल्ला मिळेल.त्यामुळे आत्मविश्वास वाढेल.

वृषभ – नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. एखाद्या सहकाऱ्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. मात्र मुत्सद्दीपणाने वागून आपण सफलता मिळवाल. फसव्या योजनांपासून सावध राहा. जोडीदाराचे मन दुखवू नका.

मिथुन – जीवनासाथीशी मधुर संबंध राहतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवणार नाही, याची काळजी घ्या. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. शक्यतो प्रवास टाळलेला बरा.

कर्क – मनात सकारात्मक विचार राहतील, असे प्रयत्न करा. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. मुलांशी संवाद साधा. प्रवास शक्यतो टाळा. महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्या. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. इतरांच्या भानगडीत पडू नका. दुसऱ्यांना सल्ला देऊ नका.

सिंह – जुनी कामे निपटून काढण्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे हलके वाटेल. सार्वजनिक कार्यात लोकांना दुखवू नका. संयमाने वागणे आवश्यक आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील. तुमच्या नावलौकिकात भर पडेल. मानमरातब मिळेल.

कन्या – व्यवसायात विक्री चांगली होईल. मात्र, नेहमीपेक्षा जास्त परिश्रम करावे लागतील. वेळात वेळ काढून थोडा आराम करणे आवश्यक आहे. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नातेवाईक भेटतील. प्रवास शक्यतो टाळा. कायद्याची बंधने पाळा. वाहने जपून चालवा.

तूळ – व्यवसायात विक्री चांगली होईल. बरकत राहील. नातेवाईक, स्नेहीजन यांची भेट होईल. मालमत्तेच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे वाचून घेणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत कामात व्यस्त राहाल. कायद्याची बंधने पाळा.

वृश्चिक – धनलाभाच्या दृष्टीनं चांगला काळ आहे. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. जुनी येणी वसूल होतील. जीवनसाथीला नाराज करु नका. एखाद्या छोटेखानी समारंभात हजेरी लावाल. नोकरीत अनुकूल घटना घडतील.

धनू – विवाहेच्छूंचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली होतील. त्यादृष्टीने काळ अनुकूल आहे. महत्त्वाच्या कामात संयमाने वागणे आवश्यक आहे. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल. नोकरीत प्रगती होईल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. मनात आत्मविश्वास राहील.

मकर – नोकरीत अनुकूल बदल होतील. कामाचे स्वरुप बदलेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. बचतीचे नियोजन केले पाहिजे. मनासारखे भोजन मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. लोकांच्या भेटीगाठी होतील.

कुंभ – धावपळीचा दिवस राहील. नातेवाइकांच्या भेटी होतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. जीवनसाथी तुम्हाला सांभाळून घेईल. नोकरीत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. एखाद्या कार्यक्रमात भाग घ्याल.

मीन – ग्रहमानाची साथ राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. कामे मार्गी लागतील. काही अचानक फायदे होतील. नोकरीत अनुकूल घटना घडतील. हितचिंतकांच्या भेटी होतील. मुलांशी संवाद साधा. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click