July 7, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – जीवनसाथी चांगली साथ देईल. महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील. सोप्या रितीने यश मिळेल. पर्यटनाच्या निमित्तानं प्रवास होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.सर्वांचे सहकार्य मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक राहील.

वृषभ – आरोग्याची काळजी घ्या. दगदग होईल अशी कामे करु नका. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. संयम सोडू नका. अचानक धनलाभ होईल. कुणी अडचणीत आणणार नाही याची काळजी घ्या. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. प्रवास शक्यतो टाळा

मिथुन – महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. थोडे क्रोधाला आवर घालणे आवश्यक आहे. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल.

कर्क – नोकरीत बदलीची शक्यता आहे. काहींना नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी थोडी दगदग होईल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. घरी पाहुणे येतील. त्यात थोडे व्यस्त राहाल. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील.

सिंह – व्यवसायात भरभराट होईल. सतत कार्यरत राहाल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. योग्य संधी मिळेल. जोडीदाराच्या मर्जीनुसार वागणे इष्ट ठरेल. कामात उत्साह राहील. मन प्रसन्न राहील.

कन्या – धनलक्ष्मीची कृपा राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यवसायात गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील.

तूळ – मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीच्या कलाने घ्या. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अडचणी दूर होतील. नातेवाईक स्नेहीजन यांची भेट होईल. व्यवसायात भरभराट होईल. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे वाचूनच सही करा

वृश्चिक – महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. संयमाची परीक्षा पाहिली जाईल. तुमचे महत्त्व लोकांना पटेल. घरी पाहुणे येतील. नातेवाईकांच्या भेटी होतील. खाण्या पिण्याची चंगळ राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. काहींना दूरच्या प्रवासाचे योग येतील.

धनू – धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. काहींना प्रवास करावा लागेल. भेटवस्तू मिळतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कामात उत्साह राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल.

मकर – नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. अचानक नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. चैनीवर खर्च करण्याकडे ओढा राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. मोहात पडून नुकसान करुन घेऊ नका

कुंभ – भाग्याची चांगली साथ राहील. आर्थिक आवक चांगली राहील. पर्यटनाच्या निमित्तानं प्रवास होतील. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च होईल. नोकरीत प्रगती होईल. भेटवस्तू मिळतील. मित्र-मैत्रिणीच्या सहवासात मजेत वेळ जाईल.

मीन – महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत चांगली स्थिती राहील. योग्य मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल. आर्थिक लाभ होईल. घरातील सदस्यांशी वाद होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click