February 8, 2023

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष

आज पूर्ण दिवस आपणास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल.कामाच्या मानाने कमी यश मिळेल त्यामुळे हताश होण्याची वेळ येईल. सत्तेसंबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल. प्रवास करू नका. पचनाविषयीच्या तक्रारी टाळा. आपण ठरविलेले काम कोणाचे नुकसान तर करणार नाही ना? याकडे लक्ष ठेवा.

वृषभ

श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास आणि मनोबल यांसह पूर्ण कराल आणि त्यात सफलताही मिळवाल. वडिलांच्या घराण्याकडून तुम्हाला काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगले यश मिळवतील. संततीचे शिक्षण व अन्य बाबी या साठी खर्च होईल. कलाकार व खेळाडू यांना आपले कौशल्य दाखवायला उत्तम दिवस. सरकारी कामातून फायदा होईल.

मिथुन

नवीन योजना सुरु करायला आज उत्तम दिवस आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची कृपादृष्टी मिळण्याचे योग आहेत. भाऊवंद शेजारी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. स्वास्थ्य टिकून राहील. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रतिस्पर्ध्यासमोर विजय प्राप्त कराल. दिवसभर वेगाने घडणार्‍या घटनात व्यग्र राहाल, असे श्रीगणेश सांगतात.

कर्क

श्रीगणेश म्हणतात की, आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. म्हणून मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. कोणाबरोबर गैरसमजातून मतभेद होतील. कौटुंबिक वातावरण वाईट होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. खर्च वाढतील. अनैतिक वर्तनाकडे वळू नका असे श्रीगणेश सांगतात.

सिंह

भरपूर आत्मविश्वास आणि दृढ निर्णयशक्ती याच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्मय घेऊन पूर्ण कराल. समाजात मानप्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावनाप्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल. मन आनंदी राहील. तरीही स्वभावातील रागीटपणा व अहंभाव कामे बिघडवणार नाहीत याकडे लक्ष द्या. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. तब्येतीची किरकोळ तक्रार राहील.

कन्या

शारीरिक अस्वस्थते बरोबर मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांबरोबर मतभेद होतील. कठोर बोलणे व गर्व यामुळे कोणाबरोबर भांडण होणार नाही याकडे लक्ष द्या. अचानक खर्च वाढतील. नोकरी करणार्‍यांनी आपल्या हाताखालच्या लोकांपासून सांभाळूनच राहा असा श्रीगणेश सल्ला देतात. कोर्टकचेरीची कामे टाळणे आज हितकर होईल.

तुळ

आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्ही आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांच्या भेटी, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. गृहस्थजिवनात सुख- शांतीचा अनुभव येईल. स्त्री मित्राची भेट होईल. आयमध्ये (मिळकती मध्ये) वृद्धी होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल. अविवाहीतांचेही विवाह जमून येतील असे श्रीगणेश सांगतात.

वृश्चिक

श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान- सन्मान उचांवेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. उच्चपदाधिकारी व वडिलधार्‍यांकडून फायदा होईल. धनलाभ होईल. व्यापारी वर्गाचे येणे वसूल होईल. संततीची प्रगती ऐकून मन खूष होईल. शारीरिक स्वास्थ्य टिकून राहील. मित्र- स्नेही यांच्याकडून फायदा होईल.

धनू

शरीरात थकवा, उबग आणि बेचैनी राहील. स्वास्थ्य साधारण असेल. मन चिंतित असेल. प्रवास करू नका अशा श्रीगणेशांचा सल्ला आहे. संततीविषयी चिंता निर्माण होईल. भाग्य साथ देणार नाही. नोकरी व्यवसायात वरिष्ठाच्या रागाची शिकार तुम्ही बनाल. प्रतिस्पर्ध्या बरोबर वादविवाद टाळा. धाडस करू नका.

मकर

खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले तर तब्येत खराब होईल असे श्रीगणेश सांगतात. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल. नकारात्मक विचार आणि राग दूर ठेवल्यास संकटापासून वाचाल. भागीदाराबरोबर मतभेद होईल. नोकरी धंद्यातील वातावरण प्रतिकूल राहील. नवीन संबंध जोडताना सावधानी ठेवा.

कुंभ

भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यासह प्रणय आणि रोमांस आजचा आपला दिवस रंगवून टाळतील. भिन्नलिंगी व्यक्तीसोबत परिचय वाढेल व मित्रता बनेल. आनंददायी सहली, प्रवास, स्वादिष्ट भोजन, नवे कपडे आपला आनंद द्विगुणीत करतील. सार्वजनिक मानसन्मान वाढेल. जोडप्याला उत्तम वैवाहिक सुख मिळेल. श्रीगणेशांना भागीदारीत लाभ दिसतो.

मीन

घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे तुम्ही आत्मविश्वासपूर्वक चांगल्या प्रकारे कराल असे श्रीगणेश सांगतात. आज आपल्याला संताप आणि बोलणे यावर संयम ठेवावा लागेल. नोकरीत सहकारी व हाताखालचे लोक यांचे सहकार्य लाभेल. स्वास्थ्य चांगले राहील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click