May 27, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज आपला स्वभाव हळवा झाल्याने कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारामुळे आपल्या भावना दुखावतील. आईच्या प्रकृतीमुळे आपण खूप चिंतित व्हाल. आपला स्वाभिमान सुद्धा दुखावला जाऊ शकतो. आपणाला थकवा जाणवेल, जेवण व झोप ह्यात अनियमितता येईल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहा. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. मनःशांतीसाठी प्रयत्न करावे लागतील. स्थावर मालमत्ते विषयी चर्चा टाळणे हितावह राहील.

वृषभ – आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज चिंता कमी झाल्याने हायसे वाटेल. आज आपण भावुक व संवेदनशील झाल्याने कल्पनाशक्ती व सृजनशक्ती डोके वर काढतील. साहित्य लेखन किंवा कला क्षेत्र ह्यात आज आपण काम करू शकाल. कुटुंबियांशी विशेषतः मातेशी सुसंवाद घडेल. छोटा प्रवास संभवतो. आर्थिक गोष्टींकडे लक्ष देऊ शकाल. आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल.

मिथुन – आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज सुरवातीच्या त्रासा नंतर आपण ठरवलेली कामे पार पडतील व त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे आपले कीती तरी त्रास कमी होऊ लागतील. नोकरी – व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्याने तेथील वातावरण चांगले राहील. मित्र किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदात भर पडेल. कुटुंबात शांती व आनंदाचे वातावरण राहील.

कर्क – आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस मित्र परिवार व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात चांगला जाईल. त्यांच्या कडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला जाऊ शकाल. तसेच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकाल. काही शुभ समाचार व आर्थिक लाभ सुद्धा मिळतील. पत्नीच्या सहवासात वेळ चांगला जाईल. आज शारीरिक व मानसिक आनंदाचा उपभोग घेऊ शकाल.

सिंह – आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज आपण कोर्ट – कचेरी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मन चिंतातुर व बेचैन असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपले बोलणे व वर्तन ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे अन्यथा कोणाशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. आपण आज हळवे व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो. काही गैरसमज होऊन आपले नुकसान होण्याची शक्यता आहे.

कन्या – आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. वाडवडील व मित्र यांच्या सहवासात आपला दिवस आनंदात जाईल. प्रवास सुद्धा संभवतो. पत्नी व संतती ह्यांच्यासह वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. संतती कडून सुखद बातम्या समजतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल.

तूळ – आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज आपले घर व कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरी करणार्‍यांना बढतीची शक्यता आहे. वरिष्ठ आज आपल्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. मातुला कडून फायदा होईल. सरकारी कामात सफलता मिळेल.

वृश्चिक – आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास होईल. वरिष्ठ आज आपल्या कामगिरीवर नाखूष होतील. संततीशी मतभेद संभवतात. आज महत्वाची कामे स्थगित ठेवणे फायदेशीर ठरेल.

धनू – आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. एखादी शस्त्रक्रिया संभवते. आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा. अचानकपणे एखादा आजार सतावेल. खर्चात वाढ होईल. वाणी व वर्तणूक ह्यावर संयम ठेवावा.

मकर – आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायी आहे. व्यापारवृद्धी होईल. ह्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी पैसा मिळून धन भांडारात वाढ होईल. प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. स्वादिष्ट भोजन, नवी वस्त्रे व वाहनसौख्य मिळेल.

कुंभ – आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस कामात यश मिळविण्यासाठी अनुकूल आहे. केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. तन मनाला उत्साह जाणवेल. नोकरी – व्यवसायात अपेक्षित सहकार्य लाभेल. मातुल घरा कडून चांगली बातमी कळेल. खर्च वाढेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

मीन – आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज आपली कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासात उत्तम प्रगती करू शकतील. आपल्या स्वभावात हळवेवणा राहील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे. मनात एखादी अनामिक भीती निर्माण होईल. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click