October 5, 2022

आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य !

मेष – आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज समाधानी वृत्ती अंगीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती असे दोघांचेही हित जपले जाईल. लेखक व कलाकारांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपार नंतर मात्र चिंता वाढतील व त्यामुळे उत्साह कमी होईल. हळवेपणा वाढेल. मित्रांसमवेत प्रवासाचे बेत आखाल. अर्थविषयक कामे कराल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल.

वृषभ – आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया आपण उत्साहित राहाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. दुपार नंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात अडचणी येतील व त्यामुळे आलेली एखादी संधी हातून निसटेल. आपल्या हटवादीपणामुळे इतरांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. शक्यतो नवे कार्य दुपारपूर्वी पूर्ण करा. भावंडांशी आपुलकी वाढल्याने अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल.

मिथुन – आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक व्यग्रता जाणवेल. दुपार नंतर कामाचा उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. आत्मविश्वास वाढेल. मनोरंजनावर खर्च कराल.

कर्क – आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजची सकाळ कौटुंबिक व व्यावसायिक जीवनात लाभदायी ठरेल. एखाद्या स्त्रीमुळे काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तिचा सहवास लाभेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर मात्र, काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. हाती असलेली कामे पूर्ण होऊ शकणार नाहीत. खर्चात वाढ होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

सिंह – आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार – व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल. मित्र व कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. एखाद्या स्त्रीमुळे लाभ होतील. संतती कडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. एखादा प्रवास संभवतो. वैवाहिक सौख्य लाभेल.

कन्या – आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. नोकरी – व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दुपार नंतर नवीन कार्याचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. प्रलंबित कामे पूर्णत्वास नेऊ शकाल. व्यापार वृद्धी होईल. कौटुंबिक जीवनात जिव्हाळा वाढेल. सामाजिक मान – सन्मान होतील.

तूळ – आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नवीन कार्यारंभात अडचणी येतील. कामाच्या व्यापामुळे मानसिक ताण वाढेल. प्रवासात त्रास संभवतो. दुपार नंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. कार्यास गती येईल. परदेशस्थ नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. नवीन कार्य हाती घेऊ शकाल.

वृश्चिक – आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात सुख व समाधान प्राप्त होईल. आप्तांसह सामाजिक समारंभात सहभागी होऊ शकाल. एखादा प्रवास संभवतो. दुपार नंतर आरोग्य विषयक तक्रारी उदभवतील. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रवासात त्रास संभवतो.

धनू – आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले नसतानाही प्रलंबित कामे आपण पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आप्तेष्टांशी जवळीक वाढेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता येईल. सामाजिक कार्यात यश प्राप्ती होईल. व्यवसाय वृद्धी होईल.

मकर – आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आपल्या वक्तृत्व शैलीने इतरांना प्रभावित कराल. गोड बोलून नवीन संबंध प्रस्थापित करू शकाल. आर्थिक नियोजनात यशस्वी व्हाल. नोकरीत सर्वांचे सहकार्य मिळवू शकाल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कामे पूर्ण होऊ शकतील. एकंदरीत आजचा दिवस आनंददायी ठरेल.

कुंभ – आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज आत्मविश्वासाच्या जोरावर आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आर्थिक कामात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. विचार प्रगल्भ होतील. कष्टाच्या मानाने अपेक्षित यश मिळाले नाही तरी आपले काम व्यवस्थितपणे केल्याचे समाधान लाभेल. प्रकुतीची काळजी घ्यावी लागेल.

मीन – आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपली काळजी दूर झाल्याचे जाणवेल. आनंद व उत्साहात वाढ होईल. कौटुंबिक व आर्थिक बाबींकडे जास्त लक्ष देऊ शकाल. खंबीर मन व पूर्ण आत्मविश्वासाने एखादे कार्य पूर्ण करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. संततीसाठी खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठे यश लाभेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click